प्रशांत देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीकरिता लाखो रुपयांचा निधी देत असतो. मात्र पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दुरुस्तीकरिता निधी मिळत नसल्याने सर्वत्र दवाखान्याची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे भंडारा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत पशुधन अधिकारी व कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून एक - दोन नव्हे सात दवाखान्यांचे रुपडे पालटले आहे.भंडारा पंचायत समिती अंतर्गत नऊ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यात मानेगाव, सिल्ली, आमगाव, धारगाव, गुंथारा, माटोरा, पहेला, दवडीपार व शहापूर येथील दवाखान्यांचा समावेश आहे. ग्रामीण जनतेकडील पशुधनांच्या देखभाल दुरुस्तीचा व्याप या पशुवैद्यकीय दवाखान्यांवर अवलंबून आहे. शासन अन्य योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी पशुधन दवाखान्यांवर खर्च करण्याकरिता ‘छदाम’ही दिले जात नाही. त्यामुळे या दवाखान्यांची दैनावस्था झाली आहे.ग्रामीण भागात आजही या दवाखान्यांना ‘ढोर दवाखाना’ म्हणूनच संबोधल्या जाते. या दवाखान्यांमध्ये कार्यरत कर्मचारी यांनी दवाखान्यांचा घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी खोब्रागडे, पशुधन पर्यवेक्षक माधव मानकर, लक्ष्मण दुर्गे, दिलीप गावंडे, विशाल भडके, परिचर पट्टीबंधक अशा विविध पशुवैद्यकीय दवाखान्यातील सुमारे २० अधिकारी व कर्मचाºयांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी घरूनच टिफीन आणून दवाखान्यातच सहभोजन करून दवाखान्यांचा कायापालट केला.‘आयएसओ’च्या धर्तीवर साहित्याची ठेवणजिल्ह्यातील मानेगाव हे पहिले पशुवैद्यकीय दवाखाना आयएसओ ठरले आहे.या दवाखान्याच्या धर्तीवर सर्व दवाखाने आयएसओ नामांकीत करण्याकरिता श्रमदानातूनच येथील औषधांची व्यवस्था अल्फाबेटीकल स्वरुपात करण्यात आलेली आहे. दवाखान्यातील सर्व साहित्य साफ करून व दवाखान्यांची साफसफाई करण्यात आली.
श्रमदानातून पालटले पशुवैद्यकीय दवाखान्याचे रुपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:57 PM
शासकीय कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीकरिता लाखो रुपयांचा निधी देत असतो. मात्र पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दुरुस्तीकरिता निधी मिळत नसल्याने सर्वत्र दवाखान्याची दैनावस्था झाली आहे.
ठळक मुद्देशासनाच्या निधीची वानवा : भंडारा पं.स.चा पुढाकार