शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मामानेच घेतला भाचीचा बळी

By admin | Published: February 01, 2016 12:36 AM

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आंबेटोला येथील शेतशिवारात २४ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.

नोंदविला कबुली जबाब : प्रकरण आंबेटोला येथील खुनाचेतुमसर : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आंबेटोला येथील शेतशिवारात २४ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. हत्या करणारा सख्खा मामाच असल्याचे उघडकीस आले असून आपल्या भाचीचाच त्याने बळी घेतला.गोबरवाही पोलिसांनी ३० जानेवारीला आरोपीला त्यांच्या राहते गाव चिखली येथून गजाआड केले. ओमप्रकाश तिगन कुंभरे (४५) रा. चिखली असे मारेकऱ्याचे नाव आहे.तालुक्यातील डोंगरी (बुज) येथे प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला सोमवारला आठवडी बाजार भरत असल्याने बाजाराकरिता घरुन निघालेली ज्योती अर्जून टेकाम (२४) ही घरी रात्री उशिरापर्यंत पोहचली नसल्याने तिचा शोध घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आंबेटोलाच्या शेतशिवारात आढळला. एक वर्षापूर्वी तिचा पती दगावल्याने ती आपल्या आईसोबत चिखली गावात राहून डोंगरी (बु.) येथे मॉयलमध्ये कंत्राटीवर मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होती. त्याच गावात ज्योतीचा मामा ओमप्रकाश कुंभरे चे वास्तव होते. दरम्यान तिच्या चारित्र्याबाबत गावात चर्चा होत असल्याने ओमप्रकाशने याबाबत बहिणीला व भाचीला हटकले होते. ‘घटनेच्या दहा ते पंधरा दिवसाआधी चिखली गावात क्रीडासत्राचे आयोजन असल्याने भाचीचा देवनारा येथील प्रियकर हा चिखली गावात आला. ही बाब दुसऱ्या दिवशी मामा ओमप्रकाश याला कळताच त्याने भाचीच्या घरी जावून तिच्या प्रियकराला व भाचिला यापुढे तुम्ही दिसलात तर जिवानिशी संपवेन अशी धमकीही दिली होती. घटनेच्या दिवशी ज्योती ही डोंगरी बु.ला आठवडी बाजाराकरीता गेली असता परतीच्या वेळेत ती व तिचा प्रियकर सायकलने येत असताना ओमप्रकाशला दिसले. प्रियकराने तिला तिथेच सोडून पळ काढला. ज्योती ही मामा ओमप्रकाशसह सायकलने चिखली येथे येत असतांना वाटेत भाचीला समजाविण्याचा प्रयत्न केला. वाद झाल्याने ओमप्रकाशने तिच्या डोक्यावर व कपाळावर दगडाने वार केला. नंतर तिच्या साडीने गळा आवळून हत्या केली असल्याचा कबुली जवाब ओमप्रकाशने पोलिसांना दिला. तपास गोबरवाहीचे पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे करित आहेत. (शहर प्रतिनिधी)