साकोली : काँग्रेस राष्ट्रवादीसह विदर्भ राज्य निर्मितीला विरोध करणाऱ्यांचा निषेध नोंदविण्यासाठी श्रीहरी अणे प्रणीत विदर्भ राज्य आघाडीतर्फे येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. लोकसभेत भाजपाचे खा.नाना पटोले हे वेगळ्या विदर्भाविषयी खासगी विधेयक आणत आहेत, अशी माहिती महाराष्ट्रातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागतात त्यांनी विधीमंडळाचे वातावरण तापवले. वेगळ्या विदर्भाची मागणी ही देशाची फाळणी करणारी मागणी नसून ही मागणी संविधानाला अनुसरूनच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पिळवणूक कधी दिसत नाही. विरोध करणाऱ्या नेत्यांच्या पक्षांनी वेगळ्या विदर्भाची आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करण्यात आले.विदर्भ राज्य आघाडी साकोली तालुक्याचे प्रभारी राकेश भास्कर यांच्या विदर्भवादी प्रवीण भांडारकर, दिपक जांभुळकर, शब्बीरभाई पठाण, सुनिल जांभुळकर, शिवदास भालाधरे, बाळू गिऱ्हेपुंजे, दिपक क्षीरसागर, लेविंद्र तोडसाम, सचिन भुजाडे, अविकुमार उजवणे, अरविंद भुजाडे, नितीन मेश्राम, सोपान पराडे, नितीन चंद्रवंशी, वसंता गोंधळे, रामू लांजेवार, जी.टी. राऊत, आर.एस. गोबाडे, ए.के. मेश्राम, मनिष क्षीरसागर, नरेंद्र वाडीभस्मे, रुपेश गायकवाड, योगेश गिऱ्हेपुंजे यासह अंसख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
साकोलीत विदर्भ राज्य आघाडीचा निषेध मोर्चा
By admin | Published: August 03, 2016 12:28 AM