स्पोर्टिंंग असोसिएशनचा पुढाकार : तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पालोरा येथे राबविला उपक्रमकरडी (पालोरा) : पालोरा येथे टायगर स्पोर्टिंग असोसिएशनच्या वतीने होळीच्या पर्वावर इको फ्रेंडली होळी उत्सवासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. पाण्याचा अपव्यय, पाणी प्रदूषण रोखण्यासाठी समाज प्रबोधन तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी आर.के. स्पोर्टस्, वनविभाग पालोरा, इंटरनॅशनल ह्युमन राईट संस्थेने सहकार्य केले. टायगर स्पोर्टिंग असोसिएशन पालोरा व मानवाधिकार समिती, जिल्हा बोर्ड, आर.के. स्पोर्टस् अकादमी, वनविभाग कार्यालय पालोरा व ग्रामपंचायतच्या विद्यमाने होळीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करण्यात आले. होळीसाठी होणारे वृक्षांच्या कत्तलीला थांबविणे, पाण्याचे प्रदूषण व अपव्यय टाळणे, गावात स्वच्छता राखण्यासाठी गावभर स्वच्छता अभियान राबविणे, गावातील रस्त्यांना वृक्षारोपण करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता. ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे होळीसाठी गावातून कचरा जमा करण्यात आला.यावेळी टायगर स्पोर्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष विरेंद्र रंगारी, महासचिव राकेश कोडापे, सदस्य साकेश चिचगावकर, पुरनमल खंडारे, अरविंद कळाम, सुरेश मोहतुरे, योगेश शेंडे, बादल तिरपुडे, संदीप येरकडे, सुशिल मेश्राम, अकलेश कोडापे, अनिल नखाते, उमेश मेश्राम, संतोष मेश्राम, संजय पचघरे, अनिल भोयर, आनंद मेश्राम, चंद्रमणी खोब्रागडे, जितेंद्र कोडापे, किशोर उईके उपस्थित होते. (वार्ताहर)
होळीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान व वृक्षारोपण
By admin | Published: March 15, 2017 12:22 AM