साकोली : कोरोनावर मात करण्यासाठी ४५ वर्षांवरील, ३० ते ४४ वयोगटातील सर्व जनतेला लसीकरण करण्यासाठी साकोली तालुक्यातील प्रत्येक गावागावांत सोमवार व मंगळवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रमेश कुंभरे यांनी दिली आहे.
या शिबिरात सोमवारी पिटेझरी, परसटोला, सोनेगाव, जांभळी/सडक, सराटी, बाम्पेवाडा, खैरी, गोंडउमरी, बोळदे, पळसगाव, वडद, विर्शी, लवारी, पाथरी, मोखे, चारगांव, गडकुंभली, खंडाळा, सालेबर्डी, साखरा, सानगडी, सातलवाडा, किन्ही/मोखे, जमनापूर, कटंगधरा या गावांचा समावेश असेल. तर मंगळवारी तुडमापूरी, खैरलांजी, आमगांव, मक्कीटोला, किन्ही/एकोडी, निलज, सालई, नैनपूर, परसोडी, सुंदरी, सितेपार, उकारा, उमरी, धर्मापुरी, बोंडे, न्याहारवानी, सिरेगाव टोला, सानगाव ही गावे असतील. प्रत्येक गाव झोनलमध्ये पंचायत समिती, वनविभाग, तहसील, पशुवैद्यकीय, बांधकाम विभाग, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी कर्तव्यदक्ष सेवेत हजर असतील.