उसर्रा परिसरात दहशत : वनविभागाची शोधमोहिम सुरूउसर्रा : गेल्या दोन तीन दिवसापासून पट्टेदार वाघाच्या दहशतीने उसर्रा परिसरातील गावकरी भयभीत झाले आहेत.उसर्रा शेतशिवारातील झुडपी जंगलात एका इसमाला पट्टेदार वाघ दिसला तो गावात येवून याबाबद गावकऱ्यांना माहिती दिली. काल ३० आॅक्टोबरला टांगा-पालडोंगरी, सालई खुर्द, उसर्रा या शेतशिवाराच्या मध्यभागात परत पट्टेदार वाघ दिसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सध्या शेतशिवारात धान कापनीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे धान कटाई करणाऱ्या महिलामध्ये वाघाची दशहत निर्माण झाली आहे. त्याबरोबरच उसर्रा, टांगा, सालई खुर्द, पालडोंगरी, येथील गावकरी पूर्णत: पट्टेदार वाघाच्या दहशतीने नागरिक शेतावर जाण्यास घाबरतात यासंदर्भात वनपरिक्षेत्र कांद्री यांना माहिती देण्यात आली यानंतर वनविभागाने वाघाच्या शोधासाठी शोधमोहिम राबविली आहे. पण वन विभागाला वाघ आहे किंवा नाही याचे प्रमाण सध्यातरी अज्ञाप मिळाले नाही. पण वाघाच्या दहशतीने गावकरी भयभीत झाले आहेत. जिल्ह्यात अभयारण्य परिसरात अवैध वृक्ष कटाईचे प्रकरण ताजे असताना वाघाच्या दहशतीनेही नागरिक धास्तावले आहेत. सायंकाळच्या सुमारास जंगलवाटेने रहदारी करण्यास ग्रामस्थ धजावत आहे. दुसरीकडे या गंभीर समस्येकडे वनविभागाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण क्षेत्रात वनविभागावर आधारित उद्योग असल्याने या समस्येचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)आम्ही वाघाच्या शोधमोहिमेवर आताही आहे पण वाघ मिळाला नाही. नागरिकांनी भिती बाळगण्याची आवश्यकता नाही. वनविभागाच्या वतीने कसून वाघाची शोधमोहिम सुरू आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.-दिनेश फटींग, वनरक्षक कांद्री.
वाघाच्या दहशतीने गावकरी भयभीत
By admin | Published: November 01, 2016 12:35 AM