शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

ग्रामस्थांनी अडविला महामंडळाचा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:37 PM

लेखी आश्वासनानंतर सोडले : जंगलाच्या विकासाऐवजी होतोय ऱ्हास, ग्रामस्थांचा आरोपविशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसराला लागून असलेल्या वनविकास महामंडळ अखत्यारीतील शेकडो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. हा जंगलाच्या विकासाऐवजी ऱ्हास आहे, असा आरोप करीत संतापलेल्या तिर्रीवासीयांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वनविकास महामंडळाच्या लहानमोठ्या लाकडांनी भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले.याचवेळी संबंधित ...

लेखी आश्वासनानंतर सोडले : जंगलाच्या विकासाऐवजी होतोय ऱ्हास, ग्रामस्थांचा आरोपविशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसराला लागून असलेल्या वनविकास महामंडळ अखत्यारीतील शेकडो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. हा जंगलाच्या विकासाऐवजी ऱ्हास आहे, असा आरोप करीत संतापलेल्या तिर्रीवासीयांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वनविकास महामंडळाच्या लहानमोठ्या लाकडांनी भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले.याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ ग्रामपंचायतीमध्ये बोलावुन विशेष आमसभा भरविण्यात आली. या सभेतच शेकडो ग्रामस्थांच्या समक्ष डी.एस. इंगळे तथा वनपरिक्षेत्राधिकारी डि.बी. राऊत (लाखनी), बि. एल. राऊत या तिन्ही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांवर लिखित आश्वासन दिले.अड्याळ जवळील तिर्री माडगी, पुरकाबोडी, किटाळी, भिमसेन टेकडी परिसरातील हजारो हेक्टरमध्ये घनदाट जंगल होते. वनविकास महामंडळाने मागील तीन ते चार वर्षापासुन येथील शेकडो प्रकारच्या लहान मोठ्या झाडांची सर्रास कत्तल केली. याचा दुष्पपरिणाम म्हणजे वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे त्यांची वाटचाल आता जंगल शेजारील गावात पाहायला मिळते. तिर्री ग्रामवासीयांनी लोकप्रतिनिधी तथा वनमंत्री व संबंधित विभागाला गेली दोन वर्षात अनेक पत्रे दिली. परंतु या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आलीे. पवनी तालुक्यातील सर्वात शेवटच्या टोकावर असणारे गाव म्हणजे तिर्री. ग्रामस्थांनी अनेकदा या आधीही अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणली आहेत. वनविकास महामंडळ हे खरच जंगलाचा विकास करत आहेत की ऱ्हास? असा प्रश्न नागरिकच विचारीत आहे. वनविकास महामंडळाची जिथे जिथे वृक्षतोड केली तिथे तिथे आजपावेतो सर्वात जास्त प्रमाणात सागवन वृक्ष लावण्यात आली. परंतू वृक्ष तोडमुळे उन्हाच्या दिवसात सावली मिळत नाही. पक्षांना खाद्य मिळत नाही. याच मनमानी कारभारामुळे व काही अधिकाऱ्यांच्या हेकेखोरवृत्तीला तिर्री ग्रामवासीयांनी चांगलाच धडा शिकविला.तोडलेल्या २० हेक्टर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येईल तेव्हा तिर्री ग्रामवासी श्रमदान करतील. परंतु या ठिकाणी केवळ सागवण वृक्ष लावण्यात आले तर लावलेले वृक्षही ग्रामस्थच काढणार, असे मत ज्यावेळी माजी उपसरपंच सुरेंद्र आयतुलवार यांनी मांडले. त्यावेळी सभेत उपस्थित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मिश्र रोपवन लावण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. परंतु वेळेवर वनविकास महामंडळाने लक्ष दिले नाही.‘मॅडम’ मराठीत बोलाआमसभेत चर्चेच्या वेळी वनपरिक्षेत्राधिकारी डि.बी. राऊत या इंग्रजीत बोलत होत्या. ग्रामस्थांना इंग्रजीे समजत नसल्याने येथे उपस्थित एका बालकाने ‘मॅडम’ मराठीत बोला, असे म्हणताच एकच हशा पिकला.