शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

ग्रामस्थांचा बोगस अधिकाऱ्यांना चोप

By admin | Published: November 20, 2015 1:27 AM

सिहोरा परिसरातील सीमावर्ती गावात मध्य प्रदेशातील बोगस अधिकारी तथा पत्रकारांच्या टोळीने धुमाकूळ माजविला आहे.

मध्य प्रदेशातील टोळी : सिहोरा परिसरातील सीमावर्ती गावातील प्रकार, पोलीस बंदोबस्ताची मागणी पूर्ण होईल तरी कधी?चुल्हाड (चुल्हाड) : सिहोरा परिसरातील सीमावर्ती गावात मध्य प्रदेशातील बोगस अधिकारी तथा पत्रकारांच्या टोळीने धुमाकूळ माजविला आहे. या टोळीत महसूल, वन तथा पोलिस विभागाचे बोगस कर्मचारी आहे. या टोळीने जंगलात अनेकांना लुटले असून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा धरणाचा मार्ग या टोळीला रामबाण ठरत आहे.भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर सिहोरा परिसरातील गावे आहेत. बावनथडी नदीचे पात्र ओलांडताच मध्य प्रदेश राज्याची सिमेला सुरुवात होत आहे. दरम्यान सध्यास्थित बावनथडी नदीचे पात्र आटले आहे. यामुळे अवैध व्यवसायिकांना रान मोकळे झाले आहे. या शिवाय सोंडयाटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी एक पदरी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणाने मध्य प्रदेशातील गावांना जोडले आहे. हा धरण जंगलात असल्याने निम्याहून अधिक वाहतूक याच धरणाच्या मार्गाने सुरु आहे. दिवस-रात्र याच धरणावरुन वाहने धावत आहेत. या धरणावर पोलिस तथा वन विभागाची चौकी नाही. धरणावर सुरक्षा नसल्याने अवैध व्यवसायीकांचे चांगेलच फावत आहेत. याच संधीचा फायदा घेण्यास मध्य प्रदेशातील हाय प्रोफाईल लुटमार टोळीने सुरुवात केली आहे. जंगल शेजारी तथा जंगलात फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना टोळीतील सदस्य टार्गेट करित आहेत. आठवडाभर या टोळीने चांगलाच धुमाकूळ माजविला. टोळीतील सदस्य कधी पोलिस तर कधी वनविभागाचे अधिकारी यांचे वेषात जंगलात फेरफटका मारत आहेत. त्यांचे सोबतीला बोगस पत्रकार आहे.गावातील नागरिकांना शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगून रक्कमेची वसूली करित आहेत. अनेक नागरिकांना टोळींच्या सदस्यांनी लुबाडले आहे. या प्रकार व घटनेपासून वन विभाग व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी अनभिज्ञ तथा बेखबर आहेत. शासकीय वेषात टोळीतील सदस्य असल्याने गावकऱ्यांनी चौकशी केली नाही. या शिवाय आपण चुकले असल्याने त्यांनी ८-१० हजार रुपये या टोळीला दिले. नंतर टोळीतील सदस्य वेषभुषा बदलवित असल्याचे काही गावकऱ्यांना लक्षात आले. या शिवाय टोळीतील सदस्यांची चर्चा सिमावर्ती गावात सुरु झाली. यानंतर गावातील काही नागरिकांनी या टोळीला समज देण्यासाठी सापळा रचला. गावातील सरपंच यांनी परिसरात असणाऱ्या पोलीस तथा वन विभागात या टोळीचे सदस्य, कार्यरत कर्मचारी आहेत किंवा नाही. याची सहनिशा व खातरजमा केली. परंतु सबंधीत नावाचे असे कर्मचारी कार्यरत नाही असे निर्दशनास आले. यामुळे गावकऱ्यांचा संशय बळावला. सोंड्या परिसरात आंतक तथा लुटमार करणाऱ्या या बोगस टोळीतील सदस्यांना चोप देण्यासाठी सापळा रचण्यात आला.गावातील एका व्यवसायीकांना टोळीतील सदस्यांनी रडारवर घेतले. आपला व्यवसाय अवैध असल्याने व्यवसायीकांनी देवाण-घेवाण विषयी चर्चा केली. या चर्चेची माहिती त्यांनी लगेच भ्रमणध्वनी वरुन पोहचती केली. गावातील नागरिक गोळा झाले. या बोगस कर्मचाऱ्यांना चांगलेच बदडण्यास सुरुवात केली. टोळीचा पर्दाफास झाल्याने लक्षात येताच सदस्य नदी पात्रातून पळून गेले. तब्बल आठवडाभर हैराण करणाऱ्या टोळी पासून गावकऱ्यांना मुक्ती मिळाली. सध्या स्थित सोंड्या परिसरात भयमुक्त वातावरण असून नविन मागण्यांची ओरड सिमावर्ती गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)