यंदा धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नियोजन केले आहे. मात्र भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे धान खरेदी केंद्र अद्यापही मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी पायपीट होत आहे. यावर्षी धानाला प्रति क्विंटल १८६८ ते १८८८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. मात्र भंडारा तालुक्यातील खुटसावरी, माडगी, टेकेपार, पिंपळगाव, राजेगाव, एमआयडीसी येथील शेतकऱ्यांना जवळपास आधारभूत धान खरेदी केंद्र नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
परिसरात धानपीक हे प्रमुख पीक असून चांगले उत्पादन होऊनही धान केंद्र परिसरात जवळ नसल्याने व्यापाऱ्यांना कवडीमोल किमतीत धान विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसून विक्रीसाठी वाहतुकीचा खर्च अधिक येत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून सोडवण्यासाठी खुटसावरी येथे धान केंद्र मंजूर करावे अशी मागणी माजी सरपंच शेषराव शेंडे, श्रावण दिघोरे, जिल्हा परिषद माजी सदस्य नीळकंठ कायते, भीमराव वहाणे, शरद भुते, बाबूराव भुते यांच्यासह परिसरातील नागरिकांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर धान खरेदी केंद्रासाठी पुढाकार घेत असले तरी त्यांच्या मागणीकडे प्रशासनाकडून पाठपुरावा होताना दिसत नाही. परिणामी लवकरच शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलनाची शक्यता आहे.भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथे आधारभूत धान खरेदी केंद्राची मागणी पूर्ण करण्यासाठी खुटसावरी परिसरातील तब्बल सहा हजार शेतकऱ्यांनी एकजूट केली आहे.
यंदा धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नियोजन केले आहे. मात्र भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे धान खरेदी केंद्र अद्यापही मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी पायपीट होत आहे. यावर्षी धानाला प्रति क्विंटल १८६८ ते १८८८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. मात्र भंडारा तालुक्यातील खुटसावरी, माडगी, टेकेपार, पिंपळगाव, राजेगाव, एमआयडीसी येथील शेतकऱ्यांना जवळपास आधारभूत धान खरेदी केंद्र नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
परिसरात धानपीक हे प्रमुख पीक असून चांगले उत्पादन होऊनही धान केंद्र परिसरात जवळ नसल्याने व्यापाऱ्यांना कवडीमोल किमतीत धान विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसून विक्रीसाठी वाहतुकीचा खर्च अधिक येत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून सोडवण्यासाठी खुटसावरी येथे धान केंद्र मंजूर करावे अशी मागणी माजी सरपंच शेषराव शेंडे, श्रावण दिघोरे, जिल्हा परिषद माजी सदस्य नीळकंठ कायते, भीमराव वहाणे, शरद भुते, बाबूराव भुते यांच्यासह परिसरातील नागरिकांनी अधिकारी व लोकप्रतीनिधींकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर धान खरेदी केंद्रासाठी पुढाकार घेत असले तरी त्यांच्या मागणीकडे प्रशासनाकडून पाठपुरावा होताना दिसत नाही. परिणामी लवकरच शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलनाची शक्यता आहे.
बॉक्स
आंदोलनाचा इशारा
भंडारा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खुटसावरी परिसर कोरडवाहू शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. परिसरात धान उत्पादन अत्यल्प झाले आहे. हाती आलेल्या धानाची विक्री करून उदरनिर्वाहासाठी धावपळ सुरू आहे. मात्र धान विक्री अभावी शेतकऱ्यांची लूट होत आहे. यासाठी कित्येकदा प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे धान खरेदी केंद्रासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. परिणामी आता खरेदी केंद्रासाठी आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.