लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर चौ : पिककर्जाशिवाय शेती कसने अशक्य असल्याने सुमार शेतकरी जिल्हा बँकेकडून सेवा सहकारी सोसायटी मार्फत पिककर्ज घेतात. घेतलेले पिककर्ज ३१ मार्चअखेर फेडल्यास केवळ मुद्दल रक्कमच द्यावी लागते. म्हणजेच शून्य व्याजदराने वर्षभर शेतकरी पिककर्ज हक्काने वापरतात. हीच पिककर्जाची रक्कम भरण्याकरिता रक्कमेची जुळावाजुळव करण्याची केविलवाणी धडपड शेतकऱ्यांची चालली असून पालांदूरच्या जिल्हा बँकेत प्रचंड गर्दी उसळली आहे.भंडारा जिल्हा धानपिक कोठार म्हणून सुपरिचित आहे. सिंचनाशिवाय शेती म्हणजे निसर्गाच्या अवकृपेने बेभरोशाची ेती अर्थात एक प्रकारचा बेभरवशाचा व्यवसाय. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे अपेक्षीत उत्पन्न हातात मिळाले नाही. मिळालेले उत्पन्न थेट हमी भाव केंद्रावर घेऊन मिळालेल्या रकमेतून वर्षभराचा संसाराचा खर्चाचे नियोजन करुन हातात उरलेल्या रकमेतून पिककर्जाची रक्कम भरणे कठीण होत असल्याने आप्त स्वकीयांना उधार उसणे करणे सुरु आहे. बºयाच शेतकऱ्यांच्या घरी आजही बारकी धान साठवणू ठेवले आहेत. भाव अत्यल्प असल्याने भाव वाढीची अपेक्षा फोल ठरत आहे. शासनाच्या धोरणाचा थेट फटका शेतीवर झाल्याने बारीक धानाला मागणी अत्यल्पआहे.जिल्हा बँकेची शून्य व्याजदर योजना शेतकºयांकरिता महत्वाकांक्षी ठरली असून शेतकरी सावकारी पाशातून मुक्त झाला आहे. याकरिता विविध कार्यकारी संस्था शेतकरी जिल्हा बँकेचा महत्वाचा दुवा म्हणून प्रामाणिकतेने काम पाहत आहे. कर्जफेडीकरिता शाखेला गर्दीचा सामना करावा लागत आहे.-विजय कापसे, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था पालांदूरशून्य व्याजदार योजना आम्हा शेतकºयांना एकदम चांगली आहे. पिककर्ज घेताना शेतकºयांना त्रास नसल्याने ही योजना चांगली आहे. मात्र सरकारने धानाचा भाव वाढविल्यास जिल्ह्यातील धान शेतकरी सुखी होईल.-बालुसिंह चव्हाण, शेतकरी, पालांदूर
शून्य व्याजदरासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 9:58 PM
लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर चौ : पिककर्जाशिवाय शेती कसने अशक्य असल्याने सुमार शेतकरी जिल्हा बँकेकडून सेवा सहकारी सोसायटी मार्फत ...
ठळक मुद्देपीककर्ज भरण्याकरिता प्रयत्न : जिल्हा बँकेची कोटट्यवधींची उलाढाल