हरिश्चंद्र कोरे।लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : अंध व्यक्तींच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश देण्यासाठी नेत्रदान ही एक चळवळ व्हावी यासाठी येथील ग्रामायण प्रतिष्ठान कार्य करीत आहे. या प्रतिष्ठानमार्फत आजपर्यंत एकुण ७५ व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान करून या राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभाग दिलेला आहे. यात सहा वर्षाच्या बालिकेपासून ६० वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या व्यक्तींनी नेत्रदान करून अंधत्व निवारणाच्या राष्ट्रीय कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे.ग्रामायण प्रतिष्ठान ही संस्था २००४ पासून विरली (बु.) येथे कार्यरत आहे. सेंद्रीय श्ेती, पारंपारिक बियाणे संवर्धन, मुद्रा आणि जलसंवर्धन यासोबतच रक्तदान, नेत्रदान, देहदान या चळवळी समाजात रूजविण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ३५० व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला असून ७५ व्यक्तींनी नेत्रदान केले आहे. सुमारे ५०० व्यक्तींनी रक्तदान केले असून २५० स्वयंसेवी रक्तदात्यांची चमू आहे. त्याचप्रमाणे पाच व्यक्तींनी देहदानाचा संकल्प केला आहे.गावात निधन झाल्याची वार्ता कळताच ग्रामायण प्रतिष्ठाानचे अध्यक्ष उद्धव कोरे, कोषाध्यक्ष राजेश महावाडे, गजानन ठाकरे आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मृतकाच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना नेत्रदानाचे कार्यकर्ते मृतकाच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना नेत्रदानाचे महत्व पटवून देतात आणि त्यांना नेत्रदानासाठी प्रवृत्त करतात. वेळप्रसंगी नेत्रदानासाठी मृतकांच्या कुटुंबियांवर प्रभाव असलेल्या गावातील मान्यवर व्यक्तींचीही मदत घेतली जाते.पार पडलेल्या ३१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाड्याच्या निमित्ताने नागपूर येथील लता मंगेशकर नेत्रपेढीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वत:च्या तरुण मुलाचे नेत्रदान करणाऱ्या येथील मुक्ताबाई कोरे या मातेचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार केला. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्रपेढीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्रामायणचे कोषाध्यक्ष राजेश महावाडे यांना प्रमुख अतिथी म्हणून नियंत्रीत करून त्यांना सन्मानीत करण्यात आले. नेत्रदान चळवळीत या गावाने राज्यात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.नेत्रदानप्रसंगीचे काही भावूक क्षणयेथील अर्चना दादाजी चुटे (२२) हिच्या मृत्यूनंतर नेत्रतज्ज्ञांची चमू येण्यास उशीर झाल्यामुळे श्ेवटी तिचा मृतदेह श्रणावर ठेवल्यानंतर स्मशानभूमीत तिचे नेत्रदान करण्यात आले.१९ वर्षीय मनीषा जागेश्वर भेंडारकर हिचा अपघात झाला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र तिच्या मातापित्यांना या दु:खद प्रसंगी तिचे नेत्रदान करून डोळे जीवंत ठेवण्याचा निर्णय घेतला.दुसºया वर्गात शिकणारी सहा वर्षांची खुशबू हृदय विकाराने मृत्यू पावली. मात्र तिच्या मातापित्यांनी प्रचंड दु:खातही तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने दोन अंधांच्या जीवनात दृष्टीचा सुगंध दरवळला.
अंधांना दृष्टीदान करणारे ‘विरली’ गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 9:30 PM
अंध व्यक्तींच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश देण्यासाठी नेत्रदान ही एक चळवळ व्हावी यासाठी येथील ग्रामायण प्रतिष्ठान कार्य करीत आहे.
ठळक मुद्देआज अंध सहाय्यता दिन : ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे ७५ व्यक्तींचे नेत्रदान