गणेशपूर ग्रामपंचायतचा पुढाकार : गुरुदेवांचे ध्यान केंद्र व परिसराचे सौंदर्यीकरणभंडारा : कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे बोट पकडून चालायला, बोलायला शिकल्यानंतर अशा ज्येष्ठांकडे कालांतराने सर्वच दुर्लक्ष करतात. त्यांना मानाचे स्थान मिळत नाही. ज्येष्ठांसाठी गणेशपूर ग्रामपंचायतने त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गणेशपूर प्रवेशद्वारालगत ‘विरंगुळा’ केंद्राची पायाभरणी करण्यात आली असून यातून विचारांचे आदानप्रदान होणार आहे.गणेशपूर येथील ज्येष्ठांसह अनेक नागरिक मिशन शाळेच्या भव्य पटांगणावर रोज फिरायला जातात. तर काही पोलीस क्रीडांगणावर तर अनेक नागरिक वैनगंगा नदीच्या तिरावर जातात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात या नागरिकांना चिखल तुडवित जावे लागते. ही परिस्थिती कायम स्वरुपी मिटावी व नागरिकांना हक्काची जागा मिळावी यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी गणेशपूर ग्रामपंचायतीला अनेकदा निवेदन दिले.ज्येष्ठांची समस्या ही आपल्या आई-वडीलांची समस्या असल्याची जाण ठेवून गणेशपूर ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी यावर तोडगा काढला. जि.प. सदस्य जया सोनकुसरे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जागा निश्चित करुन या ज्येष्ठांसाठी जागेवर हक्काचे केंद्र उभारणी करण्याच्या दृष्टीने खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे निधीची मागणी केली. त्यांनी ज्येष्ठांचा उपयोगासाठी होणाऱ्या केंद्राच्या उभारणीसाठी तातडीनी मदतीचा हात दिली. या केंद्रात सभागृह व परिसरात सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या निधीतून पाच लाखांचा निधी दिला आहे. या सभागृह व बगीचाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भुमिपूजन गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक केशवराव निर्वाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक क्रिष्णाजी थोटे, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, सरपंच वनिता भुरे, पंचायत समिती सदस्य वर्षा साकुरे, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री मनिष गणविर, देवेंद्र कारेमोरे, चंद्रशेखर खराबे, धनराज मेहर, सुभद्रा हेडाऊ, सुधा चवरे, किर्ती गणविर, दामिनी सळमते, पुष्पलता कारेमोरे, मधुबाला बावनउके, माधुरी देशकर, संध्या बोदेले यांच्यासह श्याम दलाल, प्रभाकर पराते, काशीनाथ सोनकुसरे, रायपूरकर, यशवंत साखरकर, मधुकर सेलोकर, अनंतराम मुळे, मारोती शहारे, गोविंद भुरले, अहिल्याबाई गोखले, शालु कापसे, नारायण धकाते, डोमाजी कापगते, सुभाष राखडे, योगेश कुथे, एम. जी. वडीचार, भारत भुषण, एन. आर. पाखमोडे, सुशिल बुरडे, नामदेव आवरकर, सुरेश साकुरे, शिवशंकर साठवणे, सरला पोतदार, मधुकर बावनउके, रामलाल हर्डे, गोपाल कारेमोरे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व युवकांची प्रामुख्याने उपस्थित होती. (शहर प्रतिनिधी)केंद्रातून होणार विचारांचे आदान-प्रदान विरंगुळा व गुरुदेव सेवा मंडळाचे ध्यान केंद्र असा दोन्हींचा संगम करुन येथे केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. या केंद्रात येणारे ज्येष्ठ नागरिक तथा युवक त्यांच्या विचाराना येथे एकमेकांशी आदान-प्रदान करतील. ज्येष्ठांच्या काही गाव विकासांच्या कल्पना असल्यास त्यांचा ग्रामपंचायत यथोचित स्विकार करेल. गावातील शांतता व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी या केंद्रातील ज्येष्ठांची मदत वेळप्रसंगी घेण्यात येईल.प्रवेशद्वारालगत केंद्रगणेशपूर ग्रामपंचायतीने उभारलेल्या प्रवेशद्वारालगत असलेल्या महादेव मंदिर व जिल्हा तक्रार निवारण केंद्राच्या मधात असलेली जागा केंद्रासाठी उपलब्ध करुन दिली आहे. गावाचा प्रवेशद्वारालगत होत असलेल्या या निर्माणाधीन इमारतीतून अनेकांसाठी सर्वांगसुंदर असे केंद्र तयार होत आहे. रस्ता बांधकामासाठी निधीमाजी आमदार राजेंद्र जैन यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून ज्येष्ठ नागरिकांकरिता सभागृह व बगीचा निर्मितीकरिता पाच लाखांचा निधी दिला. यासोबतच मुख्य रस्ता जिल्हा परिषद रस्ते विकास ५०५४ शिर्षक अंतर्गत डांबरीकरणासाठी १५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
ज्येष्ठांसाठी हक्काचे ‘विरंगुळा’ केंद्र
By admin | Published: March 30, 2017 12:33 AM