प्रमुख पाहुणे म्हणून महासंघाचे सल्लागार आनंदराव बावणे, सुधाकर चंदनखेडे, गोपाल शेंडे, उत्तम शेंडे, डॉ. महेंद्र लांडगे, रामदास शेंडे, अनिल मेश्राम, रंजना सोनवणे, दादाजी बागडे, शालिकराम मेश्राम, सुखदेव गेडाम, केशव सोनटक्के, सरपंच शालू गहाणे, कुशन पाटील परशुरामकर, उपसरपंच गोपाल परशुरामकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण फुलबांधे, धर्मदास नैताम, वासुदेवराव बांगडकर, राजपाल बावनकर, पोरस शेंडे, महासंघाचे सदस्य शामराव आत्राम, सेवानिवृत्त कृषी अधिकारी मनोहर सोनटक्के, एकनाथ कोसरे, तुळशीराम हजारे, महिला सदस्य कल्पना नैताम, कुसुमताई कोसरे, हजारे आदी उपस्थित होते. महासंघाचे लाखांदूर तालुका संघटक स्वर्गीय हरिदासजी बागडे यांना महासंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमासाठी जनार्दन शेंडे, सदाशिव कुमरे, निळकंठ नैताम, दुधराम शेंडे, पांडुरंग बावणे, तुळशीराम बागडे, जानबा शेंडे, हरी शेंडे, कृष्णा शेंडे, सुमित्रा शेंडे, गायत्री शेंडे, निशा मेश्राम, माया गेडाम, कुंदा मेश्राम, मालका कुमरे, लक्ष्मी शेंडे, वैशाली कुमरे, डाली मेश्राम, कमला कुंभरे पुरुष व महिला कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. समाजाच्या युवक-युवतींनी उत्कृष्टपणे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बाहेरगावातील प्रेक्षकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. बक्षीसही दिले. संचालन चंदू मेश्राम व आभार मोतीराम कुंभरे यांनी मानले.