लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी तालुक्यात स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवून व्यापक जनजागृती केल्या जात आहे. मिरेगाव येथे मतदारा तू जागा हो, लोकशाहीचा धागा, हो मतदान करा ह अशा घोषवाक्यातून दिव्यांग नवमतदार व ज्येष्ठ मतदारांमध्ये मतदानाची व्यापक जनजागृती करुन आवाहन करण्यात आले.तहसीलदार विराणी यांच्या मार्गदर्शनात लाखनी तालुक्यातील मिरेगाव, सोनमाळा, भूगाव, मेंढा, पळसगाव, कोलारी निमगाव व कन्हाळगाव येथे नोडल अधिकारी नरेश नवघरे ग्रामसेवक भोतमांगे, मेश्राम, तलमले, गायधने, बारसे, नंदेश्वर यांच्या पथकाने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदानाची जनजागृती करण्यात आली. नागरिकांना लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्व, ईव्हिएम व व्हिव्हिपॅटबाबत प्रात्यक्षिक तसेच दिव्यांग मतदारांकरीता मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मिरेगाव येथे मतदारा तु जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदान करा ह अशा स्वरुपाचे संदेश संदेश रांगोळी व रोपटे यांच्या माध्यमातून देवून मतदारांना आवाहन करण्यात आले. उपरोक्त गावात पार पडलेल्या जनजागृती कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.१० व ११ ऑक्टोबरला जनजागृती१० ऑक्टोबरला गोंडेगाव, गुरठा, इसापूर, नेहारवाणी, मचारणा , कवडसी येथे दिवसभर स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांना जागृत केल्या जाणार आहे. ११ ऑक्टोबरला पोहरा, लाखोरी, गोंडसावरी, लाखनी, लाखनी शासकीय आयटीआय, येथे ग्रामपंचायत कार्यालयात मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
मतदारा तू जागा हो, लोकशाहीचा धागा हो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 5:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी तालुक्यात स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवून व्यापक जनजागृती केल्या जात ...
ठळक मुद्देदिव्यांग ज्येष्ठ नागरिक व नवमतदारांकरीता स्वीप कार्यक्रमातून जनजागृती