तुमसर/मोहाडी: पोटनिवडणुकीत तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघातील सुमारे ३५ ते ४० मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्यामुळे गोंधळ उडाला. शेकडो मतदार यामुळे घरी परतले. सुमारे दोन ते अडीच तास मतदान प्रक्रिया बंद पडली होती. नवीन व्हीव्हीपॅट यंत्र बसविल्यावर पुन्हा मतदानाला सुरूवात झाली. सोमवारला हे सरकारचे षडयंत्र असल्याची चर्चा दिवसभर मतदारसंघात सुरू होती. तुमसर मतदार संघात ३८ ते ४० टक्के मतदान झाले.तुमसर तालुक्यात मांगली, तुमसर, पांजरा, सिहोरा, मांढळ, खरबी, खापा, माडगी, बोरी, उमरवाडा, धनेगाव, जांब, लोहारा, तुमसरातील नेहरू, माकडे, रामजी गणेशा शाळेतील मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड निर्माण झाले होते. दुपारी १ वाजेपर्यंत केवळ १० टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ४.३० पर्यंत ३५ टक्के तर संध्याकाळी ६ पर्यंत ३८ ते ४० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.सायंकाळी पुन्हा ५ वाजता खापा येथे व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाला. सकाळी ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर गेले होते. परंतु व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाचा हक्क बजावला नाही.व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना झाल्यानंतर अभियंते मतदान केंद्रावर जाऊन तांत्रिक अडचण, नवीन व्हीव्हीपॅट मशीन लावले. परंतु ३५६ मतदान केंद्र असून त्याकरिता केवळ ५ अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली होती.पवनीत शेकडो मतदार मतदानापासून वंचितपवनी : लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रातील ईव्हीएम दुपारी २.३० पासून बंद होती. सायंकाळी ५.३० वाजता मतदार पुन्हा मतदान केंद्रावर आले परंतु ईव्हीएम मशीन बदलण्यात आली नाही. त्यामुळे ६०० पेक्षा जास्त मतदार वंचित राहिले. पवनी तालुक्यात मतदान संपेपर्यंत ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी मशीन बंद पडत राहिल्याने ३० ते ३५ मतदान केंद्रावर मतदान खोळंबले. मतदारांनी मतदानापासून वंचित ठेवल्याचे खापर सरकार व निवडणूक आयोगावर फोडले. मतदान करु न शकलेल्या मतदारांनी केंद्राध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे. तीन-तीन तास मतदार मतदान केंद्रावर राहून सरकार व निवडणूक यंत्रणाविरुद्ध संताप व्यक्त केला.व्हीव्हीपॅट मशीनमधील सेंसर तीव्र प्रकाशामुळे खराब झाल्याने व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्या. २० ते २२ मशिन बंद झाल्या होत्या. अभियंत्यांनी तांत्रिक बिघाड दूर केला. कुठे नवीन व्हीव्हीपॅट यंत्र लावण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्रावरील कर्मचाºयांना प्रशिक्षणादरम्यान तीव्र प्रकाश टाळण्याची माहिती दिली होती.-स्मिता पाटील,उपविभागीय अधिकारी तुमसर.
तुमसर क्षेत्रात ३५ मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:43 PM
पोटनिवडणुकीत तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघातील सुमारे ३५ ते ४० मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्यामुळे गोंधळ उडाला. शेकडो मतदार यामुळे घरी परतले. सुमारे दोन ते अडीच तास मतदान प्रक्रिया बंद पडली होती.
ठळक मुद्देमतदारांनी फिरविली पाठ : ३५६ मतदान केंद्राकरिता ५ अभियंते