वनसंपदेचे नुकसान : उपाययोजना अपुऱ्यापालांदूर : सूर्य आग ओकत आहे. पाण्याची टंचाई आवासून उभी आहे. अशातच जंगलात आग लागण्याचे प्रमाण दररोजच वाढत आहेत. ही आग नैसर्गिकरित्या कमी तर मानवनिर्मित अधिक असल्याचे समजते आहे. मांगली किटाडी या जंगलातील रस्त्याच्या कडेला सुमारे अर्धा कि.मी. पर्यंत आग लागली असून वनसंपदा धोक्यात आली आहे.वनाला संरक्षण देणे सगळ्यांचे काम आहे. परंतु क्षुल्लक स्वार्थाने पीडित लोक वनाला आग लावतात. यात मोहफुल व तेंदूपत्ता संकलन करणारे लोक रोजगाराकरिता वनाची अपरिमीत हानी करतात. किटाडी, मांगली, रेंगोळा, सायगाव वनक्षेत्रात अनेक ठिकाणी आग लागल्याचे गावकऱ्यांनी लोकमतला भ्रमणध्वनीवरून कळविले आहे. वनमजूर, वनकर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने वेळेत आग आटोक्यात आणायला विलंब होत असतो. (वार्ताहर)
मांगली-किटाडी मार्गावरील वनाला आग
By admin | Published: April 18, 2017 12:35 AM