रंजीत चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तविकता निदर्शनास येत आहे.सिहोरा परिसरात वाहणाºया बावनथडी नदीच्या पात्राने दोन महिन्यापुर्वीच पाण्याची चणचण सुरु झाली. या नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. या नदीचे काठावर असणाºया सीमावर्ती आणि मध्यप्रदेशातील गावातील नळ योजनाचे अभिनव जलकुंभ रिकाम्या आहेत. गत दोन महिन्याचे पुर्वीपासून या गावात पाणी टंचाईची झळ नागरिक सोसत आहे. या नळ योजनांना तारण्याकरिता राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्यात आले असले तरी नदीचे पात्रातच पाणी आटले आहे.राजीव सागर धरणाचे पाणी महिनाभर तहान भागविण्यास असमर्थ ठरले आहे. याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आहे. परंतु या प्रकल्पात साधे पिण्याचे पाणी नाही. १४ हजार शेती ओलीताखाली आणणारा महत्वाकांक्षी प्रकल्प घोटभर पाण्यासाठी त्रस्त झाला आहे. प्रकल्प स्थळात सुरक्षा करणाºया गार्डांना घरुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. प्रकल्प स्थळात भेट देणाºया पर्यटकांना पिण्याचे पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. परंतु प्रशासन साधे हातपंप खोदकामाला मजुंरी देत नाही. प्रकल्प स्थळात प्रशासनाचे उदासिन धोरणामुळे कृत्रिम पाणीटंचाई सुरु झाली आहे. प्रकल्पाचे स्थळात दिव्याखाली अंधार असे चित्र आहे.वैनगंगा नदी काठावर अनेक पाणीपुरवठा करणाºया योजनाचे पंपगृह आहेत. याच नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धरणाच्या पाण्यावर गोंदिया जिल्ह्यातील अदानी वीज प्रकल्प, उपसा सिंचन योजना, तिरोडा आणि तुमसरला पाणी पुरवठा करणाºया नळ योजना आहेत. धरणात पाणी अडविण्यात येत असल्याने नदी काठालगत असणाºया गावातील नळ योजना आणि विहिरींना संजीवनी मिळाली आहे. परंतु महिनाभरापासून वैनगंगा नदीचे विशाल पात्र कोरडे पडले असल्याने विहिरीचे जलस्त्रोत आटले आहे. थेंबभर पाण्यासाठी विशाल पात्र त्रस्त झाले असल्याने सुकळी नकुल गावाचे शिवारातून नदी पात्रातून पायदळ प्रवास सुरु झाला आहे.नदी पात्रात सदैव पाणी राहत असल्याने काठावर सावधानतेचा फलक लावण्यात आला आहे. या फलकाचा कोरड्या पात्रात काही उपयोग नाही. नद्याचे विशाल पात्र आटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. याचा फटका थेट उन्हाळी धानाचे पिकांना बसला आहे. पाण्यअभावी एकरातील धानाचे पिक करपले आहे. नदीचे पात्र आटल्यानेच सुकळी नकुल गावात गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी गावात भिषण पाणी टंचाईचे चित्र सिहोरा परिसरात नाही. नळ योजना गावकऱ्यांची तहान भागवित आहेत.फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीसुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. परंतु नागरिकांना घोटभर पाणी मिळाले नाही. या योजनेने मात्र यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तथा कंत्राटदाराचे खिसे भरुन काढले आहे. नागरिकांच्या उपयोगाकरिता योजना तयार करण्यात आली असली तरी निष्क्रियतेमुळे तथा अनियंत्रीत कारभारामुळे पाणी मिळाले नाही. या योजनेत निधीचे वारेन्यारे केल्या प्रकरणी यंत्रणेला जबाबदार धरण्यात काय येवू नये, कार्यकारी अभियंता ते अभियंता तथा अन्य कर्मचाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आता सरंपच करीत आहेत.
वैनगंगा, बावनथडी नद्यांचे पात्र आटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:01 PM
बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तविकता निदर्शनास येत आहे.
ठळक मुद्देसुकळीत नळाला गढुळ पाणी : गावागावात विहिरींनी गाठला तळ, उन्हाळी धान पिकाचे प्रचंड नुकसान