शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

स्वयंरोजगार प्रेरणेसाठी वैनगंगा प्रदर्शनी व विक्री

By admin | Published: March 30, 2017 12:38 AM

बचत गटाच्या महिलांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. याच प्रेरणेतून त्यांनी स्वयंसिध्द केले.

डीआरडीएचा पुढाकार : हाताने बनविलेले साहित्य खरेदीसाठी उमळली गर्दीभंडारा : बचत गटाच्या महिलांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. याच प्रेरणेतून त्यांनी स्वयंसिध्द केले. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करताना बाजारपेठेचा अनुभव यावा यासाठी शिवाजी क्रीडा संकुलावर वैनगंगा प्रदर्शनी व विक्री सुरु करण्यात आली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातील बचतगटांना त्यांनी तयार केलेल्या साहित्य विक्री करण्याचा अनुभव यावा हा या प्रदर्शनी मागचा मुळ उद्देश आहे. २७ ते ३१ मार्चपर्यंत ही प्रदर्शनी व विक्री शिवाजी क्रीडा संकुलावर राहणार आहे. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद अहिरे, प्रकल्प संचालक जगन्नाथ भोर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पाच दिवसीय या प्रदर्शनीत जिल्ह्यातील विविध गावांमधून ६४ बचत गटांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांनी तयार केलेले साहित्य या प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनीतूनच साहित्यांची विक्री करण्यात येत आहे.प्रदर्शनीसाठी विस्तार अधिकारी अतुल वर्मा, किरण बनकर, सरोजनी खोब्रागडे, विनोद शेंडे, दिपक मडावी, तालुका गटसमन्वयक व बचत गटांच्या महिला व पुरुष सहकार्य करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)या साहित्यांची प्रदर्शनी महिलांनी हातानी तयार केलेली एम्ब्रायडरी साडी, कापडी बॅग, अगरबत्ती, मेणबत्ती, बांबू चटई, मशरूम, फिनाईल, गुळ, लोंच, पापड, मिरची मशाला, रानमेवा, खवय्यांसाठी पुरणपोळी, रुमालरोटी, लाडू आदी साहित्य विक्री व प्रदर्शनीत ठेवण्यात आली आहे. यासह अन्य प्रकारच्या साहित्यांची खरेदी करण्याकरिता नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.