मध्यप्रदेशासह राज्यात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यप्रदेशात सतत पाऊस सुरू असल्याने गाेंदिया जिल्ह्यातील पुजारीटाेला प्रकल्पाचे चार गेट ०.३० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यासाेबत कालीसरार प्रकल्पातूनही पाणी साेडले जात आहे. त्यामुळे भंडारा येथे वैनगंगा नदीला पूर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती लक्षात घेता पवनी तालुक्यातील गाेसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
भंडारा येथील कारधा लहान पुलावर वैनगंगेचा जलस्तर शुक्रवारी २४४.१२ मीटर नाेंदविण्यात आला. येथे इशारा पातळी २४५ मीटर असून धाेका पातळी २४५.५० मीटर आहे. इशारा पातळीच्या केवळ ०.८८ मीटर खाली आहे. कालीसरार धरणाचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता आहे. कालीसरार धरण हे बाघ नदीवर असून धरणातील पाण्याचा विसर्ग पुजारीटाेला प्रकल्पात हाेताे. पाणी साेडल्यानंतर भंडारा शहराजवळील कारधा पुलाजवळ पाणी पाेहाेचण्यास ३१ तासांचा कालावधी लागताे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे. वैनगंगा नदीच्या तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गत २४ तासात जिल्ह्यात २५.९ मिमी पाऊस
जिल्ह्यात गत तीन दिवसापासून पाऊस काेसळत असून गत २४ तासात जिल्ह्यात २५.९ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस माेहाडी तालुक्यात ५१.६ मिमी नाेंदविण्यात आला. लाखनी येथे ४१.२ मिमी, साकाेली येथे ३५.४ मिमी, भंडारा २५.३ मिमी, तुमसर २५.२ मिमी, पवनी १.४ मिमी, लाखांदूर येथे १.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे.