लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा जलस्तर बुधवारी इशारा पातळीवर असून सकाळी या ठिकाणी ९.४० मीटर जलस्तर मोजण्यात आला. सीमावर्ती प्रदेशात झालेल्या पावसाने आणि विविध प्रकल्पातून पाणी सोडल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.भंडारा शहराजवळ कारधा येथे बुधवारी सकाळी पाणी पातळी ९.४० मीटर होती. इशारा पातळी ९ मीटर असून धोका पातळी ९.५ मीटर आहे. सीमावर्ती भागात झालेल्या पावसामुळे वैनगंगेचे पाणी इशारा पातळीपर्यंत पोहचले आहे. वैनगंगेची पाणी पातळी वाढत असल्याने पवनी येथील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. केंद्रीय जल आयोगाच्या सूत्रानुसार वैनगंगा नदीचा जलस्तर रात्री ९.४० मीटरवर पोहचला होता. परिणामी गोसी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने पाणी पातळी ३२ से.मी. ने घटली आहे. बुधवारी दुपारी वैनगंगेचा जलस्तर कारधा जवळ ९.०८ मीटर मोजण्यात आल्याचे सांगण्यात आले.गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व वक्रदार उघडलेपवनी : भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून वैनगंगेची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे पवनी येथील गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. बुधवारी सकाळी प्रकल्पाचे सात दरवाजे दीड मीटरने तर २६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. या ३३ दरवाज्यातून २ लाख ७१ हजार ११३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुजारीटोला प्रकल्पाचे आठ आणि कालीसराड प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडल्याने वैनगंगेची पातळी वाढली आहे.
वैनगंगा नदी इशारा पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:40 PM
शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा जलस्तर बुधवारी इशारा पातळीवर असून सकाळी या ठिकाणी ९.४० मीटर जलस्तर मोजण्यात आला. सीमावर्ती प्रदेशात झालेल्या पावसाने आणि विविध प्रकल्पातून पाणी सोडल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
ठळक मुद्दे९.४० मीटर जलस्तर : सीमावर्ती प्रदेशात झालेल्या पावसाचा परिणाम