तुमसर शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये विनोबा भावे नगरातील बावनथडी वसाहत परिसरात नाल्यांचे नियोजन मागील पाच वर्षांपासून करण्यात आले नाही. अनेक वर्षापासून येथील नाल्यांचे बांधकाम प्रलंबित आहे. सांडपाणी कुठे सोडावे असा प्रश्न पडला आहे. सांडपाणी परिसरातच राहत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील रहिवासी नोकरी व व्यवसाय करणारे आहेत. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाला नियमित भर देतात परंतु नाली बांधकामाचे नियोजन करण्यात आले नाही. स्वच्छ शहर स्मार्ट शहर अशी घोषणा प्रशासनाकडून करण्यात येते. परंतु त्याचा प्रत्यक्षात प्रत्यय येत नाही.
येथील रहिवाशांनी नालीचे नियोजन करावे अन्यथा नगरपरिषद प्रशासनाला कर देणार नाही, असा इशारा निवेदनातून प्रा. कमलाकर निखाडे, नवल शर्मा, अंकित चौबे, प्रशांत जोशी, सुमित चकोले, हरिराम तितीरमारे, गीता सांगोळे, सागर भगत, सीमा शरणागत, एस.टी. शरणागत, निंबाळकर, दलाल, मनीष कुकडे यांनी दिला आहे.