मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जिल्ह्यात खरीप हंगामात धानाची खरेदी जोरात सुरु असून उच्च प्रतीच्या धानाला भाववाढ मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. त्यामुळे सध्या आधारभूत केंद्रावर निम्न प्रतीचा धानच शेतकरी विकत असल्याचे दिसत आहे. तर उच्च प्रतीचा धान मिळेल त्या भावात देश असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. उच्च प्रतीचा आणि निम्न प्रतीचा धान येथे पिकतो. परंतु दोन्ही धानाला अपेक्षित दरच मिळत नाही. पालांदूर येथे उच्च प्रतीच्या धानाला १९५० ते २१०० या दरात विकावे लागत आहे. एवढ्या अल्प दरात उच्च प्रतीचा धान विकणे शेतकºयांना परवडत नाही. परंतु नाईलाजाने शेतकºयांना आर्थिक समस्येमुळे हा धान विकावा लागत आहे. आधारभूत केंद्रावर योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व्यापाºयांकडे धाव घेत आहेत. चौरास भागातील पवनी तालुक्यात लाखो टन उच्च प्रतीचा धान मिलिंगसाठी भातगिरणीत पडून आहे. नागपूरचा व्यापारी भावाच्या अनुषंगाने काय निर्देश देतो यावर मिलिंग केले जात असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात एचएमटी, केशर, जयश्रीराम आरपीएम या उच्च प्रतीचे धान पिकविले जाते. त्याला मोठी मागणी आहे. परंतु भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. सध्या निम्न प्रतीचा धान शेतकरी आधारभूत केंद्रावर विकत आहे. त्याठिकाणी १७५० रुपये भाव मिळत आहे. या ठिकाणी शेतकरी गत काही दिवसांपासून धान विकण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासोबतच धानाला बोनस जाहीर होण्याचीही प्रतीक्षा अनेक शेतकऱ्यांना आहे. धान उत्पादक शेतकरी प्रभाकर कडूकार म्हणाले, धानाला भाव मिळाला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.
उच्च प्रतीच्या धानाला दरवाढीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 10:15 PM
जिल्ह्यात खरीप हंगामात धानाची खरेदी जोरात सुरु असून उच्च प्रतीच्या धानाला भाववाढ मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. त्यामुळे सध्या आधारभूत केंद्रावर निम्न प्रतीचा धानच शेतकरी विकत असल्याचे दिसत आहे. तर उच्च प्रतीचा धान मिळेल त्या भावात देश असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका : निम्न धानाचा आधार