लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या शेतीची खरेदी शासनाकडून केली जात आहे. तुमसर दुय्यम उपनिबंधक कार्यालयात प्रकल्पग्रस्त वयोवृध्द महिला-पुरुष मागील चार ते पाच दिवसांपासून येत आहेत, परंतु या विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने प्रकल्पग्रस्तांना अधिकाऱ्यांची दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे. तहसील कार्यालयाचा व्हरांड्यात खालीच बसावे लागते. तहसिल कार्यालयात किमान बसण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. काही महिला आपल्या लहान मूलासंह ताटकळत उभ्या होत्या.बावनथडी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत. शासन त्यांच्याकडून रितसर रजिस्ट्री करुन शेती खरेदी करीत आहे.शुक्रवारी आंबागड, बपेरा येथून वृध्द-महिला पुरुष जमीनीची रजिस्ट्री करण्याकरिता आले होते. तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात ते बसले होते. गुरुवारी सुध्दा आम्ही आलो होतो, पंरतु कामे झाली नाही. साहेब आले परंतु उशिरा आले, त्यामुळे शेतीची रजिस्ट्री झाली नाही असे महिलांनी सांगितले.त्यामुळे पुन्हा शुक्रवारी यावे लागले. दूपारी २ वाजेपर्यंत त्यांची कामे झाली नव्हती. महसूल, प्रकल्पाचे अधिकारी व रजिस्ट्रार यांच्या उपस्थितीनंतरच रजिस्ट्रीचा सोपस्कार पार पाडला जातो. नेमके कोणते अधिकारी उपस्थित नव्हते हे प्रकल्पग्रस्त सांगू शकले नाही. यातील काही महिला आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन आल्या होत्या. त्यांनी जमिनीवर सातबारावर आमच्या नोंदी असल्याने आम्हाला तिरोडा येथून यावे लागत असल्याची माहिती दिली. किमान तहसील कार्यालयात बसण्याची सोय उपलब्ध करुन देण्याची येथे गरज आहे.लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु असल्याने महसूलसह इतर शासकीय विभागाच्या बैठका सुरु आहेत. त्यामुळे अधिकारी अनुपस्थित असल्याची शक्यता आहे. परंतु त्यांचा फटका वृध्द-महिला -पुरुषांना येथे बसत आहे.
बावनथडी प्रकल्पग्रस्तांना अधिकाऱ्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 9:38 PM
बावनथडी प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या शेतीची खरेदी शासनाकडून केली जात आहे. तुमसर दुय्यम उपनिबंधक कार्यालयात प्रकल्पग्रस्त वयोवृध्द महिला-पुरुष मागील चार ते पाच दिवसांपासून येत आहेत, परंतु या विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने प्रकल्पग्रस्तांना अधिकाऱ्यांची दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे.
ठळक मुद्देनागरिकांची फरपट : दोन दिवसांपासून शेतीची रजिस्ट्री थांबली