शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

जागतिक विक्रम नोंदविण्यासाठी 'पुरुषोत्तमची' प्रतीक्षा

By admin | Published: March 20, 2017 12:18 AM

उत्तम आरोग्यासाठी, नियमित व्यायाम हे सूत्र नेहमी सांगितले जाते. याचाच अवलंब करुन नियमित व्यायामातून शरीर सुदृढ राखतानाच...

दुर्दम्य इच्छाशक्ती : एका तासात मारतो १, ८८० भारतीय दंड भंडारा : उत्तम आरोग्यासाठी, नियमित व्यायाम हे सूत्र नेहमी सांगितले जाते. याचाच अवलंब करुन नियमित व्यायामातून शरीर सुदृढ राखतानाच स्वत:चे वेगळेपण सिद्ध करीत जिल्हा आणि देशाचा गौरव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर, त्यात वावगे काय? इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि यशस्वी होण्याची तळमळही आहे. परंतू आड येते आहे, ती 'आर्थिक' चणचण! भारतीय दंड (इंडियन पुशअप) मारण्याचा 'रेकॉर्ड' गिनीज बुकमध्ये नोंदविण्यासाठी नोंदणी शुल्क देण्याची क्षमता नसलेला व ६० मिनीटात १८८० दंड मारणारा हा तरुण केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या स्वप्नाकडे डोळे लावून आहे. आता ही स्वप्नपूर्ती दात्यांच्या हातभारातूनच शक्य म्हणावी लागेल!भारतीय व्यायाम पद्धती सोपी नाही. प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीतूनच माणूस यात निपून होऊ शकतो. असाच एक विशिष्ट ध्येयाने वेडा झालेला तरुण भंडारा शहरात आहे. व्यायामाने शरीर मजबूत आणि आरोग्य सुदृढ राहते. हे ठिक असले तरी व्यायामातूनच स्वत:चे वेगळेपणही सिद्ध केले जाऊ शकते, हेच या तरुणाने दाखवून दिले आहे. मोहाडी ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या येथील पुरुषोत्तम चौधरी यांनी वयाची ४५ वर्ष गाठली. परंतू विश्वविक्रम करण्याची जिद्द मात्र अजून सोडली नाही. वयाच्या १४ व्या वर्षांपासून येथील बहिरंगेश्वर व्यायामशाळेत नियमित सरावाला सुरुवात केली. पाच भारतीय दंडकांपासून सुरुवात करणाऱ्या पुरुषोत्तम याने सरावात सातत्य ठेवल्याने शंभर, दोनशे आणि एका तासात १४५० दंडकापर्यंत कधी पोहचला हे कळलेच नाही. सातत्याच्या जोरावरच २०१२ साली त्याच्या या विक्रमाची नोंद लिमका बुकमध्ये झाली. प्रशासनाकडून त्यावेळी त्याचा गौरवही झाला होता. पहिला गढ पार केल्यानंतर गिनीज बुकात आपला विक्रम नोंदविण्यासाठी त्याने धडपड सुरु केली. यात सातत्य आणि प्रचंड मेहनत आहे. मात्र सर्वकाही असताना पैसा हा अडसर ठरीत आहे. जागतिक स्तरावर विक्रम नोंदविण्यासाठी भरावयाचे नोंदणी शुल्कच अवाढव्य आहे. येणाऱ्या मिळकतीतून शुल्क भरणे त्याला शक्य नाही. मात्र प्रयत्न अजूनही सोडलेले नाहीत. २०१२ पासून त्याची ही धडपड सुरु आहे. कुणाचा तरी मदतीचा हात पाठिशी येऊन जिल्ह्यासह देशाचे नाव या अस्सल भारतीय क्रीडा प्रकारात आपल्याला उंचावता येईल, अशी अपेक्षा त्याला आजही आहे. शासन स्तरावर क्रीडापटूंच्या उत्थानासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांना सोयीसुविधा मिळाव्या म्हणून निधीही खर्च केला जातो. अशावेळी एका आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद करण्याची क्षमता ठेऊन असलेल्या तरुणाच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. मदत मिळाल्यास मेहनतीच्या जोरावर हे यश सहज गाठता येईल. (नगर प्रतिनिधी)