शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

पावसाच्या प्रतीक्षेत आटाेपली ९४ टक्के राेवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:40 AM

भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियाेजनानुसार यावर्षी १ लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर राेवणी हाेणार हाेती. सुरुवातीला दमदार पाऊस काेसळला. ...

भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियाेजनानुसार यावर्षी १ लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर राेवणी हाेणार हाेती. सुरुवातीला दमदार पाऊस काेसळला. मात्र गत महिन्याभरापासून पावसाचा जाेर कमी झाला. तुरळक सरी साेडता जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस झाला नाही. दुसरीकडे नर्सरीतील पऱ्हे माेठे हाेऊ लागले. पाऊस नाही, राेवणी कशी करायची या चिंतेत शेतकऱ्यांनी उसणवार करीत शेतात सिंचनाची सुविधा केली आणि एकदाची राेवणी आटाेपली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५२ हजार ६७ म्हणजे ९४.१६ टक्के राेवणी आटाेपली आहे. त्यात सर्वाधिक राेवणी पवनी तालुक्यात १३७ टक्के म्हणजे २५ हजार २५३ हेक्टरवर करण्यात आली आहे. तर सर्वात कमी राेवणी माेहाडी तालुक्यात ७०.२ टक्के म्हणजे १९ हजार २२ हेक्टरवर करण्यात आली आहे.

धान पिकाला माेठ्या प्रमाणात पावसाची गरज असते. परंतु यावर्षी पाऊस कुठे काेसळताे आणि कुठे काेसळत नाही अशी अवस्था झाली आहे. संपूर्ण राज्यात जाेरदार पाऊस झाला असला तरी गत तीन आठवड्यात भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. १ जून ते १२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७९८.७ मिमी पाऊस काेसळताे. सध्या जिल्ह्यात ८३ टक्के पाऊस काेसळला आहे. एकीकडे राेवणी झाली परंतु पाऊस बरसत नाही. त्यामुळे अनेक काेरडवाहू शेतकऱ्यांनी इंजीन लावून आता सिंचन सुरू केले आहे. शेतशिवारात डिझेल इंजीनचा आवाज घुमू लागला आहे.

बाॅक्स

तूर १,२६७ हेक्टर तर साेयाबीन ७६० हेक्टरवर

जिल्ह्यात धान पिकासाेबतच तूर आणि साेयाबीनचे पीकही माेठ्या प्रमाणात घेतले जाते. धानाच्या बांधावर तुरीची लागवड केली जाते. कृषी विभागाच्या नियाेजनानुसार १९४६ तूर क्षेत्र असून आतापर्यंत १,२६७ म्हणजे ६५.१३ टक्के लागवड झाली आहे. तर साेयाबीनच्या ६,५९१ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ७६० हेक्टरवर म्हणजे ११.५३ टक्के लागवड करण्यात आली आहे.

बाॅक्स

तालुकानिहाय राेवणी

तालुका क्षेत्र प्रत्यक्ष टक्केवारी

भंडारा २१३०६ २१४९९ १००

माेहाडी २७०९६ १९०२२ ७०

तुमसर २७५६९ २५९१७ ९४

पवनी १८६१२ २५२५३ १३७

साकाेली १८५०१ १५४५२ ८३

लाखांदूर २५७७६ २४८०५ ९६

लाखनी २२६३१ १९८३९ ८७

एकूण १६१४९३ १५२०६७ ९४