शहरं
Join us  
Trending Stories
1
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
2
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
3
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
4
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
5
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
6
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या आरोपांनंतर मोठी घोषणा
7
अरे देवा! जेलमध्ये रामलीला, कैद्यांनी केला वानरांचा रोल; सीतेला शोधायला गेले अन् पळाले
8
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
9
भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
10
कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
11
'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-
12
'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
13
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."
15
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
16
चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या
17
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल
18
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
19
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
20
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

सेवानिवृत्तधारकांना प्रवास सवलतीची प्रतीक्षा

By admin | Published: August 21, 2016 12:32 AM

राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सेवा करणाऱ्या व सध्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या वतीने सेवानिवृत्तीचा लाभ मिळत नाही.

व्यथा रापम कर्मचाऱ्यांची : भंडारा येथील सभेत एल्गार, आज गडकरींच्या वाड्यावर मोर्चाभंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सेवा करणाऱ्या व सध्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या वतीने सेवानिवृत्तीचा लाभ मिळत नाही. त्यासोबतच त्यांना बारमाही प्रवास सवलतीपासून वंचित रहावे लागत आहे. सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रवास सवलत व निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी करण्यात आली. यासाठी रविवारला नागपूर येथील नितीन गडकरी यांच्या वाड्यावर मोर्चा काढण्यात येत आहे.राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने भंडारा येथील मुस्लीम लायब्ररी येथे विभागाीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना या मागण्यांसाठी एल्गार पुकारण्याचा ठराव घेतला आहे. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश येंडे, चावके, ठवकर, आर. बी. चौबे, के. ई. कडव, एम. बी. नायडू, एल. एम. रंगारी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या मेळाव्याला सुमारे २०० पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी ईपीएस-९५ (भविष्य निर्वाह निधी) अंतर्गत सेवानिवृत्ती लाभापासून वंचित आहेत. त्यांचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना मिळावा, अशी अपेक्षा असतानाही त्यांची बोळवण होत आहे. यासोबतच राज्य परिवहन निवृत्तांना (पती-पत्नी) यांना केवळ दोन महिन्यांचा प्रवास सवलत पास देण्यात येतो. त्यात बदल करून त्यांना बारा महिन्यांचा नि:शुल्क सवलत पास देण्यात यावा, असा ठराव यावेळी करण्यात आला. यासर्व मागण्यांसाठी व किमान जगण्याइतपत सेवानिवृत्ती द्यावा व भगतसिंग कोशियाची समितीचा अहवाल मंजूर करावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर रविवारला मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चात आंतर राज्यीय पदाधिकारी तसेच राज्याचे पदाधिकारी शेकडोंच्या संख्येत उपस्थित राहणार आहे. प्रास्ताविक व संचालन एल. एम. रंगारी यांनी केले. तर आभार के. ई. कडव यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)