लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भात सर्वात कमी पाऊस धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात झाला आहे. १ ते २५ जून पर्यंत १६३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १३.९ मिमी पाऊस कोसळला. गतवर्षी याच कालावधीत ११५.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यातही तीन तालुक्यात तर अद्यापपर्यंत पावसाचा थेंबही पडला नाही. परिणामी पेरणीची कामे ठप्प झाली असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.बहुतांश जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली. मात्र याला भंडारा जिल्हा अपवाद ठरला. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २५ जून या कालावधीत १६३.१ मिमी पाऊस बरसणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र १३.९ मिमीच पाऊस झाला असून हा सरासरीच्या केवळ ९ टक्के आहे. त्यातही भंडारा, पवनी आणि लाखांदूर तालुक्यात अद्यापपर्यंत पावसाचा थेंबही पडला नाही. मोहाडी तालुक्यात २९.८ मिमी, तुमसर ४९ मिमी, साकोली ४.६ मिमी आणि लाखनी तालुक्यात २.८ मिमी पावसाची नोंद झाली. पाऊस नसल्याने शेतीची कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पाऊस बरसेल या आशेवर पऱ्हे टाकले. आता बहुतांश पºहे रोवणीयोग्य झाले आहेत. परंतु पाऊसच नसल्याने रोवणी करावी कशी असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकºयांना पडला आहे. एकीकडे पावसाचा पत्ता नाही तर दुसरीकडे प्रचंड उन्ह तापत आहे. काही काळासाठी ढगाळ वातावरण निर्माण होते. पाऊस बरसण्याची शेतकºयांना आस लागते. मात्र काही वेळातच आकाश निरभ्र होऊन जाते. जिल्ह्यात १ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी पूर्णत: थांबली आहे. पाऊस लांबल्यास धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.रोहिणी, मृग कोरडारोहिणी नक्षत्रापासून पावसाला प्रारंभ होतो. परंतुअद्यापही पूर्व विदर्भात मान्सून सक्रीय झाला नाही. रोहिणी नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. मृग नक्षत्रात पाऊस बरसेल अशी आशा होती. परंतु एक दिन ठिकाणी केवळ सरी कोसळल्या. मृग नक्षत्रानेही शेतकºयांची निराशा केली. आता आद्रा नक्षत्र सुरु आहे. या नक्षत्रात पाऊस बरसेल अशी अपेक्षा आहे. परंतु अद्यापही पावसाचे कोणतेच चिन्ह दिसत नाही.
धानाच्या कोठारात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:20 PM
विदर्भात सर्वात कमी पाऊस धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात झाला आहे. १ ते २५ जून पर्यंत १६३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १३.९ मिमी पाऊस कोसळला. गतवर्षी याच कालावधीत ११५.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यातही तीन तालुक्यात तर अद्यापपर्यंत पावसाचा थेंबही पडला नाही. परिणामी पेरणीची कामे ठप्प झाली असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
ठळक मुद्देभंडारात सर्वात कमी पाऊस : पऱ्हे झाले रोवणीयोग्य, शेतकरी चिंतातूर