तुमसर : बघेडा या सांसद आदर्श गाव येथे दोन महिन्यापूर्वी झालेल्या शिबिरातून अजूनपर्यंत गरजूंना दाखले मिळाले नाही. यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दि. १२ आॅगस्ट रोजी बघेडा येथे आयोजित शिबिरात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सेतू केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. या शिबिरात जातीचे प्रमाणपत्र ६८, अधिवास प्रमाणपत्र ३९, उत्पन्नाचे प्रमाणपत्र २१ नागरिकांनी विविध कागदपत्र सादर करून मागणी केली होती. यात विद्यार्थ्यांची अधिक संख्या होती. या गरजूंना दोन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी अजूनपर्यंत प्रमाणपत्र मिळाले नाही. याप्रकरणी माजी सरपंच हेमराज सिरसाम व माजी नगरसेवक सुरेश मलेवार यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोन महिन्यांपासून दाखल्यांची प्रतीक्षा
By admin | Published: October 11, 2015 2:00 AM