लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दोन शैक्षणिक वर्षांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली नाही. समाजकल्याण विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती १५ दिवसांच्या आत त्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाच्या लाखांदूर शाखेतर्फे लाखांदुरचे तहसीलदारांना यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती सुमारे ७५ टक्के विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना व सबंधित दोन वर्षाची शिष्यवृत्ती जमा न झाल्याने विद्यार्थ्यांपुढे पुढील शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.सबंधित शिष्यवृत्तीबाबत विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांची ओरड आहे. शैक्षणिक सत्र सुरू होताच, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी शिष्यवृत्तीची तरतूद आहे.मात्र, दोन-दोन वर्षांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न करण्यामागे शासनाचा कुठला कुटील डाव तर नाही ना? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. संबंधित ७५ टक्के विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती १५ दिवसाच्या आत जमा करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा लाखांदूर शाखेतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.४५० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षºयांचे निवेदन लाखांदूरचे तहसीलदार यांच्या मार्फत शिक्षणमंत्री, आयुक्त शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग भंडारा, जिल्हािकारी भंडारा यांना देण्यात आले आहे.शिष्टमंडळात बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष शारूख पठाण, जिल्हा महासिचव निशांत बडोले, तालुका समन्वय आशिष गजभिये, विद्यार्थी प्रतिनिधी प्रिती परशुरामकर, उपाध्यक्ष विष्णू बुरडे, प्रती रामटेके, पुष्पा कांबळे, जयश्री रामटेके, यशोदिपीका चौधरी, विभा मेश्राम, कल्पना हटवार, प्रशित बडाले, लंकेश सुखदेवे, अश्विन मोटघरे, त्रिलोक बडोले, निलेश मोटघरे, साहिल जांभुळकर, प्रियंका मेश्राम, शितल हुमे, तनुजा बन्सोड, भरत राऊत, साहिल गजभिये, अजय मेर्शाम, अमोल नागदेवे, वैशाली मेश्राम, दिक्षा कसार, स्नेहल शिंगाडे, माधुरी ठाकरे, मालता पचारे, पायल राऊत, प्रियंका फुंडे, कांता पचारे, िनखिल लोखंडे, वंदना कुतरमारे, करण उके, लोकेश अडीकणे, स्मीता मोटघरे आदींचा समावेश होता.शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येत आहे. यावर जिल्हा प्रशासन काय तोडगा काढतो, याकडे शैक्षणिक क्षेत्रात उत्सुकता आहे.
दोन वर्षांपासून शिष्यवृतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 9:29 PM
दोन शैक्षणिक वर्षांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली नाही. समाजकल्याण विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : मागण्यांची पूर्तता करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा