लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा (चौ) : पवनी तालुक्यातील मोखारा येथे घराची भिंत कोसळून दोन जण ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. देवलाबाई नखाते (६०) व भगवान बोरकर (७५) अशी मृतांची नावे आहेत.माहितीनुसार, देवलाबाई नखाते यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले होते. योजनेअंतर्गत घर बांधकामाचा पहिला हप्ता त्यांच्या बँकेतही जमा झाला होता. बांधकाम होत असल्याने जुने घर पाडण्यासाठी नखाते यांनी काम सुरु केले होते.रविवारी सकाळी जुने घर पाडण्याला सुरुवात केली असता, घराची मोठी मातीची भिंत देवलाबाई यांच्या अंगावर कोसळली.तसेच मजूर म्हणून कार्यरत असलेले भगवान बोरकरही यात सापडले.देवलाबाई यांच्या जागीच मृत्यू झाला तर बोरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम पवनी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बोरकर यांचा मृत्यू झाला. पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास पोलिस हवालदार चौधरी करीत आहेत.
भिंत कोसळून दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 9:33 PM
पवनी तालुक्यातील मोखारा येथे घराची भिंत कोसळून दोन जण ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. देवलाबाई नखाते (६०) व भगवान बोरकर (७५) अशी मृतांची नावे आहेत.
ठळक मुद्देमोखारा येथील घटना : होणार होते घरकुलाचे बांधकाम