मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातून वाहणाऱ्या जीवनदायी वैनगंगा नदीत बेसुमार रेतीचे उत्खनन सुरू असून यामुळे नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने वाहत आहे. नदीतीरावरील सुमारे १० ते १२ गावातील ४२ हेक्टर शेतजमीन वैनगंगेने गिळंकृत केली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप कोणताही मोबदला मिळाला नाही. तसेच संरक्षक भिंतीसाठीही कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाही.तुमसर तालुक्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. या नदीच्या तिरावर अनेक गावे आहेत. त्यापैकी बपेरा, रेेंगेपार, मांडवी, उमरवाडा, बोरी, कोष्टी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा या गावातील नदीतीरावरील शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन दरबारी ४२ हेक्टर शेती गिळंकृत झाल्याची नोंद आहे. राज्य शासनाने सुमारे १५ वर्षापुर्वी याची दखल घेतली होती. परंतु कागदी घोडे नाचविण्यापलिकडे दुसरे काहीही झाले नाही.अलिकडे वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमा नदीने ठरल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव केले जाते. वाहतुकीसाठी सोयीस्कर व्हावे म्हणून नदीची नैसर्गिंक संरक्षक भिंत थडी खचविली जात आहे. तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याने नदीचा प्रवाह बदलत आहे. परिणामी नदी गावाच्या दिशेने वाहत आहे. नदीकाठावरील गावातील सुपीक व गाळाची जमीन नदीने गिळंकृत केली आहे. पाणीपुरवठा योजना विहिरी जलकुंभाला जलसमाधी मिळाली आहे.संरक्षक भिंतीवर कोट्यवधींचा खर्च अपेक्षिततुमसर तालुक्यातील नदीकाठावरील गावशिवारातील शेती गिळंकृत होवू नये, यासाठी संरक्षक भिंती बांधण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार व राज्य शासनाकडून निधी मिळावा लागणार आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपुर्वी राज्य शासनाने या गावांचे सर्व्हेक्षण करून अहवाल शासनाला पाठविला आहे. त्यावर कोणत्याच उपाय योजना करण्यात आल्या नाही.तीरावरील शेती नदीपात्र गिळंकृत करीत आहे. पुढे नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने येत आहे. गावाला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.-शिशुपाल गौपाले, उपसभापती पंचायत समिती, तुमसर.
वैनगंगेने केली ४२ हेक्टर शेती गिळंकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 6:00 AM
तुमसर तालुक्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. या नदीच्या तिरावर अनेक गावे आहेत. त्यापैकी बपेरा, रेेंगेपार, मांडवी, उमरवाडा, बोरी, कोष्टी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा या गावातील नदीतीरावरील शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन दरबारी ४२ हेक्टर शेती गिळंकृत झाल्याची नोंद आहे. राज्य शासनाने सुमारे १५ वर्षापुर्वी याची दखल घेतली होती. परंतु कागदी घोडे नाचविण्यापलिकडे दुसरे काहीही झाले नाही.
ठळक मुद्देरेती उपस्याचा परिणाम : १५ वर्षांपासून नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने, संरक्षक भिंतीची गरज