तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मनात जिद्द व मेहनत करण्याची तयारी असली कि परिस्थितीवर सहज मात करता येते. हे वाक्य खरे करून दाखवले वरठीच्या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मयूर केशव भुरे याने.. पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मयूरने तयार केलेल्या ‘आॅलं टेरेन वेहिकल’ (ए. टी . वि. ) ला जागतिक स्पर्धेत अव्वल कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. मयूरने या वाहनाचा ‘ट्रान्समिशन’ विभाग म्हणजे महत्वाचा ‘मेकॅनिझम’ तयार केले आहे. त्याशिवाय हे वाहनांची कल्पना करणे अशक्य आहे. परिस्थितीवर मात करून त्याने केलेल्या कामगिरी ही युवकांसाठी प्रेरणादायी आहे.मयूरचा जन्म सोनुली येथे झाला. १५ वर्षांपासून त्याचे वडील वरठी येथील जगनाडे चौकात राहतात. लहान पणापासून मयुर अभ्यासात हुशार. प्राथमिक शिक्षण सोनुलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण भंडारा येथील लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात घेतले. त्यावेळी त्या दहावीत ९४ टक्के गुण मिळवले होते. गुणवत्तेच्या आधारावर पॉलीटेकनिक नागपूर येथे शिक्षणासाठी प्रवेश घेतला. डिप्लोमानंतर पदवीचे शिक्षण तो पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात घेत आहे. मयूरच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. वरठी येथील तलावाजवळ त्याच्या वडिलांचे छोटेशे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. त्या दुकानाच्या भरवश्यावर वडिलाने त्याचे शिक्षण पूर्ण करण्याचा विडा उचलला. शिक्षणासाठी कर्ज काढले. पुण्यासारख्या शहरात महाविद्यालयाची फीस सोबत राहणे व खाण्याचा खर्च भागवणे म्हणजे कसरत आहे. अशाही परिस्थितीत मुलात असलेली शिक्षणाची चुनूक ओळखून त्याच्या वडिलाने त्याला शिकवले. वडिलांच्या कसोटीवर खरं उतरत त्याने शिक्षणाबरोबर एक अभिनव वाहन तयार करून जागतिक ख्याती प्राप्त केली आहे. यासाठी महाविद्यालयातील २५ युवकाची टीम सहभागी होती. या वाहनासाठी अभिनव संकल्पना साकारली. पण हे वाहन तयार करण्यासाठी महत्वाचं मेकॅनिझम हे मयूरने तयार केले आहे. ट्रान्समिशन म्हणून तयार झालेल्या या मेकॅनिझम शिवाय हे वाहन रस्त्यावर धावणे अशक्य होते. नवीन दोषरहित तंत्रज्ञान व त्यासाठी योग्य ती चाचणी करून उपयुक्त वाहन साकारण्यचे श्रेय मयूरला आहे. इंदोर येथील राष्ट्रीय स्पर्धेत भारतातील १५० अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्याथ्यार्नी सहभाग घेतला होता. यात त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. त्यांनी तयार केलेल्या आलं टेरेन वेहिकल ची निवड जागतिक स्पधेर्साठी करण्यात आली. एप्रिल महिन्यात अमेरिकेतील मेरीलँड येथे जागतिक स्पर्धा झाली. तीन गटात झालेल्या स्पर्धेत एका गटात प्रथम व उर्वरित दोन गटात द्वितीय क्रमांक आणि एकूण संपूर्ण कामगिरीवर जगातून चवथा क्रमांकरिता त्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत मयूर सह ९ मुलांनी सहभाग घेतला होता. टीम नेमेसिस रेसिंग ग्रुप म्हणून त्यांनी संयुक्त कामगिरी केली होती.जागतिक स्पर्धेत ५ देशातील १२० महाविद्यालयाच्या १२० मॉडेल सादर करण्यात आले होते. या वाहनाला आशिया खंडातील बेस्ट चमू व इनोवेशनं अवॉर्ड देऊन मयूरच्या चमूला गौरवान्वित करण्यात आले.काय आहे आलं टेरेन वेहिकल ?खडतर मार्गावर अखंड धावणारे हे आलं टेरेन वेहिकल आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरून हे वाहन न थांबता धावू शकते. पहाडी भाग, खड्डे असलेले रस्ते किंवा पाण्यातून सहज वाट शोधून हे वाहन नियोजित स्थळापर्यंत अविरत चालवता येते. या वाहनाचा मेकॅनिझम व गियर बॉक्स सीव्हीटी ( कन्टीनुएशली वारियाबल ट्रान्समिशन) तंत्रज्ञानाने तयार केला आहे. यामुळे खडतर किंवा प्रवासायोग्य नसलेल्या भागातून हे वाहन कोणतेही दुखापत न करता धावू शकते. शेतात हे तंत्रज्ञान उपयोगी असून कोणत्याही प्रकारचे जाड सामान वाहून नेण्यास किंवा खोदकामास उपयोगी आहे. धावण्याच्या शर्यतीत सुद्धा वापर येऊ शकतो.
वरठीच्या मयूरची जागतिक आॅटोमोटिव्ह स्पर्धेत भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:19 PM
मनात जिद्द व मेहनत करण्याची तयारी असली कि परिस्थितीवर सहज मात करता येते. हे वाक्य खरे करून दाखवले वरठीच्या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मयूर केशव भुरे याने..
ठळक मुद्देअभियांत्रिकी पदवी घेताना एटीव्ही वाहन तयार केले : अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत अव्वल कामगिरी