लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : चांदपूर जलाशयाच्या गेटला (चिकार) गेल्या कित्येक दिवसांपासून गळती लागली असून हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे धानाच्या सिंचनासाठी शेतकरी पाण्याची मागणी करीत आहे तर दुसरीकडे जलाशयातील पाणी वाहून जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दरवाजाची दुरूस्तीच झाली नसल्याचे पुढे आले आहे.तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात ब्रिटीशकालीन चांदपूर जलाशय आहे. ३८८ हेक्टर क्षेत्रात हा जलाशय विस्तारलेला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पानंतर सिहोरा परिसरात सिंचन क्षेत्रात वाढ करण्यात आली. १४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असल्याची नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात नोंद असलेल्या क्षेत्राचे ओलीतच होत नाही. कालव्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे. अनेक कालव्यात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचत नाही.जलाशयाचा पाणी सोडण्याचा दरवाजा ब्रिटीशकालीन आहे. यादरवाज्यातूनच सिंचनासाठी पाणी सोडले जाते. परंतु त्याला गळती लागल्याने दररोज हजारो लीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच जलाशयालाही धोका निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे या धरणाचे आजपर्यंत खोलीकरण करण्यात आले नसून दिवसेंदिवस सिंचन क्षमताही कमी होत आहे.
चांदपूर जलाशयाच्या पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 6:00 AM
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात ब्रिटीशकालीन चांदपूर जलाशय आहे. ३८८ हेक्टर क्षेत्रात हा जलाशय विस्तारलेला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पानंतर सिहोरा परिसरात सिंचन क्षेत्रात वाढ करण्यात आली. १४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असल्याची नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात नोंद असलेल्या क्षेत्राचे ओलीतच होत नाही.
ठळक मुद्देगेटला गळती : अनेक वर्षांपासून दुरूस्तीच नाही