लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : पूरग्रस्त बोरी गावाचे शेतशिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिवारातील तीन गावांना पाण्याची गरज असून जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची ओरड होत आहे. अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांनाही दिले आहे.वैनगंगा नद्यांचे काठावर असणाऱ्या बोरी गावाचे शेतशिवारात नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले होते. या पुरामुळे शेतकऱ्यांचे धान पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पूराने धान पीक होत्याचे नव्हते झाले आहे. उत्पादन निम्म्यावर आले असल्याने लागवड खर्च निघणे कठीण आहे. गावात रोजगाराचे अन्य साधने नाहीत. शेती हा एकमेव व्यवसाय असून मजूरांना यामुळे रोजगार मिळतो. याच व्यवसायावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. खरीप हंगामातील पीकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पीक हातात येणार मात्र . त्या पिकांना मावा, तुडतुडाने ग्रासले आहे. पूर आणि किडीमुळे धान पीक हातातून गेले आहे. शेतकऱ्यांचे सारे कुटुंब कामे करीत आहेत.शासन स्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल राज्यातील शासन कटिबद्द असल्याने शेतकऱ्यांचे अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी आशावादी झाले आहेत. मदतीने त्यांना आधार मिळणार असला तरी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उन्हाळी धान पिकांना पाणी वितरणाचे नियोजन करण्याची ओरड सुरू झाली आहे.बोरी, उमरवाडा, नावरगाव शिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी दिल्यास संजीवनी ठरणार आहे. खरीप हंगामातील पुरामुळे झालेली अन्यधान्य नासाडीची भरपाई काढण्याकरिता शेतकऱ्यांना आधार होणार आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची ओरड शेतकरी करीत आहेत. गावाचे शिवारात प्रकल्पाचे नहर आणि कालवे आहेत. यामुळे प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकांना मिळण्या करिता शेतकरी संघर्ष करीत आहेत.शासनाची आर्थिक मदत अल्प राहणार असल्याने बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याकरिता शेतकरी ओरडत आहेत. या गावांना पाणी देण्याकरीता सत्तापक्षाचे कार्यकर्ते अनुकूल असून यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे. खासदार प्रफुल पटेल, आमदार राजू कारेमोरे यांना शेतकऱ्यांनी पाण्यासाठी साकडे घातले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष देवाचंद ठाकरे यांनी निवेदन देऊन चर्चा केली.बोरी, उमरवाडा, नवरगाव शेत शिवारात उन्हाळी धान पीक लागवड करिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी प्रकल्प प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे, या संदर्भात वरिष्ठ यांचे सोबत चर्चा करणार असून राज्य शासन शेतकऱ्यांचे पाठीशी आहे.-रेखा ठाकरे, माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा.
बावनथडी प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धानाला देण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 5:00 AM
बोरी, उमरवाडा, नावरगाव शिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी दिल्यास संजीवनी ठरणार आहे. खरीप हंगामातील पुरामुळे झालेली अन्यधान्य नासाडीची भरपाई काढण्याकरिता शेतकऱ्यांना आधार होणार आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची ओरड शेतकरी करीत आहेत. गावाचे शिवारात प्रकल्पाचे नहर आणि कालवे आहेत. यामुळे प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकांना मिळण्या करिता शेतकरी संघर्ष करीत आहेत.
ठळक मुद्देतर रब्बी पिकांना होईल आधार : पुरामुळे खरीप हंगामातील धान पिकांचे नुकसान