लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी वाचविण्याची गरज आहे. गावागावात पाण्याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. संपूर्ण जिल्ह्यात जलसंधारण आणि सिंचनावर भर देत आहोत. यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्य उत्पादक शुल्क मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.साकोली उपविभागाची आढावा सभा साकोली येथे शनिवारला पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार मधुकर कुकडे, आमदार बाळा काशीवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, सभापती रेखा वासनिक, नगराध्यक्ष धनवंता राऊत, जिल्हा परीषद सदस्य नेपाल रंगारी, गणवीर उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, सर्व ग्रामपंचायतीच्या नळयोजना या सौरउर्जेवर करण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचे विजेच्या बिलाचे दरमहा होणारे पैसे वाचतील. तालुक्यातील खंडविकास अधिकाºयांना निर्देश दिले की, तालुक्यातील सर्व गावातील नादुरुस्त बोअरवेलची यादी पाठवून त्या ठिकाणी नवीन बोअरवेल तात्काळ नवीन करण्यात याव्या, जेणेकरून उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. यावर्षी ज्या ज्या तलावांचे खोलीकरण करण्यात आले नाही अशा सर्वच तलावांचे खोलीकरण करण्यात येईल, असे निर्देश संबंधित अधिकाºयांना देण्यात आले. ज्या गावात दूषित पाणी पुरवठा होत आहे, त्या पूर्ण गावात जलशुद्धीकरण योजना देण्याचेही पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. साकोली - लाखनी व लाखांदूर या तीन्ही तालुक्यातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्यात आली आहे. तसेच अतिक्रमणधारकांना ५०० फुटापर्यंत मोफत जमिनीचे पट्टे देण्याचीही कारवाई करण्यात आली आहे. एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर योजनेचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सभेत वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी दिली. शेतकरी कर्जमाफीची योजनाही यशस्वीरित्या पूर्ण होत असून येत्या ३० डिसेंबरपर्यंत शेतकºयांचे सातबारा कोरा करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.निम्न चुलबंद, भीमलकसा प्रकल्पाचे काम दिवसरात्र करून लवकरात पूर्ण करा असे निर्देशही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.उपविभागीय अभियंत्यांचे मोबाईल प्रकरण गाजणारसभेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता ऋतूजा वंजारी मंचकावर आल्या व माहिती देत असताना त्या वारंवार मोबाईलकडे बघत होत्या. यावर पालकमंत्री भडकले. त्यावेळी त्यांनी सांगितले की सदर विभागाच्या कामाची यादी कागदोपत्री नसून मोबाईलमध्ये आहे. यावर पालकमंत्र्यांनी विचारले की मला कागदोपत्री माहिती हवी आहे. यावर वंजारी यांनी पाच मिनिटात प्रिंटआऊट काढून देतो म्हणून सांगितले. मात्र सभा संपली तरी कागदपत्रे पालकमंत्र्यांना दिले नाही. यावेळी पालकमंत्री यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयात या प्रकरणाची तक्रार करून उपविभागीय अभियंता ऋतूजा वंजारी यांची गडचिरोली जिल्ह्यात स्थानांतरण करण्याची सूचना केली. त्यामुळे या उपविभागीय अभियंत्यांना मोबाईल प्रकरण भोवणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पालकमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबीसाकोली येथे आयोजित आढावा सभेत पालकमंत्र्यांनी कोट्यवधीचा निधी जिल्ह्यासाठी आणून दिल्याची माहिती दिली. मात्र ही कामे करताना कुणाही अधिकाºयांनी भ्रष्टाचार करू नये व असे केल्यास त्या अधिकाऱ्यांची बदली करण्यापेक्षा त्यांची वेतनवाढ रोखण्यात यावी अशा सूचना उपस्थित जिल्हाधिकाºयांना केल्या. यावेळी उपस्थितअधिकाऱ्यांचे चेहरे पाहण्याजोगे होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उपविभाीगय अधिकारी अर्चना मोरे यांनी केले.साकोली विधानसभा क्षेत्रातून चुलबंद नदीचे पात्र गेले आहे. पावसाळ्यात येणारे पाणी वाहून जात असल्याने नदीत पाणी राहत नाही. प्रत्येक गावाजवळ व दोन गावांना जोडणाºया रस्त्यावर बंधारा व त्यावरून जाण्यासाठी रस्ता, यासाठी एकुण बंधाºयाची निर्मिती करण्यात येणार आहे.-बाळा काशीवार, आमदार
जिल्ह्यात जलसंधारण आणि सिंचनावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 9:43 PM
दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी वाचविण्याची गरज आहे. गावागावात पाण्याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. संपूर्ण जिल्ह्यात जलसंधारण आणि सिंचनावर भर देत आहोत. यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्य उत्पादक शुल्क मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. साकोली उपविभागाची आढावा सभा साकोली येथे शनिवारला पार पडली.
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : साकोली उपविभागाची आढावा सभा, अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल