लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पाणीपुरवठा योजनेची जुनी टाकी तोडत असताना स्लॅबचा मलबा खाली कोसळला. याचवेळी मलब्याखाली दबून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर येथे मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद मडावी (२७), अजय लोखंडे (२५) दोघे रा. पिंपळगाव कोहळी अशी जखमीची नावे आहे.पाणीपुरवठा योजनेची जुनी टाकी जीर्ण झाल्याने ती मागील दोन महिन्यापासून तोडणे सुरू आहे. प्रमोद व अजय ड्रिल मशीनने टाकीचा स्लॅब तोडत होते. अचानक स्लॅबसह दोघेही उंचावरून खाली कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी दोघांनाही लाखांदूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.सुरक्षेचा अभावग्रामीण भागात आजही जीव धोक्यात घालून कामे केली जातात. लाखांदूर येथे घडलेल्या प्रकाराने पुन्हा एकदा कामाप्रसंगी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जलकुंभ तोडत असताना उपाययोजना करण्यात आल्या असत्या तर दोन्ही मजुरांना गंभीर दुखापत झाली नसती. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जलकुंभाचा स्लॅब कोसळला, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:17 AM