लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : धानपीक वाचविण्याकरिता शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. परंतु बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेचे गेट स्वत: शेतकरी उघडतात. तर कधी दुसरे शेतकरी तो बंद करतात. शेतकऱ्यांचा येथे उपद्रव वाढत आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. पाणी वितरण व्यवस्था करताना पोलीस बंदोबस्त लावावा अशी मागणी जि.प. सदस्य देवसिंग सव्वालाखे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.बावनथडी धरणात मुबलक जलसाठा आहे. देव्हाडी शिवारातील सुकळी, चारगाव, ढोरवाडा, माडगी, देव्हाडी येथे सिंचनाचे पाणी दोन दिवसापूर्वी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सुरु करण्यात आला. परंतु काही उपद्रवी लोकांनी कुशारी गेट बंद केल्याने देव्हाडी शिवारातील गावांना पाणी बंद झाले. येथे काही जण अधिकाºयांना दमदाटी करणे, अरेरावी करणे इत्यादी उपद्रव सुरु आहे. संबंधित प्रकल्पाचे कर्मचारी भयभीत झाले आहेत. कुशारी गेट कुणीही सुरु करीत असून कुणीही बंद करण्याचा सर्रास प्रकार सुरु आहे. कुशारी रोहणा, पिंपळगाव, महालगाव वितरिकांना पाणी सुरु आहे. देव्हाडी शिवारातील शेतकऱ्यांसोबत केवळ दुजाभाव सुरु आहे. प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य देवसिंग सव्वालाखे यांनी केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकºयांसोबत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.बावनथडी धरणात पाणी साठा उपलब्ध असून ते पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना पीके वाचविता येऊ शकेल. त्यातूनच प्रत्येकाला पाणी मिळण्याची खात्री निर्माण होऊ शकते.परंतु नियमबाह्यपणे वितरिकेचे गेट सुरु व बंद प्रकार करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी येथे दखल घेण्याची गरज असल्याची ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे.
पाणी वाटपात सावळागोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 9:45 PM
धानपीक वाचविण्याकरिता शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. परंतु बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेचे गेट स्वत: शेतकरी उघडतात. तर कधी दुसरे शेतकरी तो बंद करतात. शेतकऱ्यांचा येथे उपद्रव वाढत आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. पाणी वितरण व्यवस्था करताना पोलीस बंदोबस्त लावावा अशी मागणी जि.प. सदस्य देवसिंग सव्वालाखे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
ठळक मुद्देशासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी : अरेरावीचे प्रकार वाढले