आॅनलाईन लोकमतभंडारा : राजेगाव एमआयडीसी येथील ग्रामस्थांना नहराचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी व बहुजन समाज पक्षाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतु शेतकºयांच्या या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शेतकरी व बसपा पदाधिकाºयांनी ग्रामपंचायतसमोर आत्मदहनासाठी खोदलेल्या खड्ड्यात पालकमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन केले.२६ जानेवारीला अधिकाऱ्यांची दिवसभर वाट पाहत असतानाही प्रशासनाने शेतकरी व आंदोलकांची दखल घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील लाकूड आगारच्या समोरील रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. वेळीच कारधाचे ठाणेदार रत्नाकर मानकर यांनी हस्तक्षेप करीत लाखनी पोलिसांना पाचारण केले. लाखनीचे पोलीस निरीक्षक सोरसे यांनी आंदोलनकर्त्यांना समजाविले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत वरिष्ठांशी संपर्क साधून भंडाराचे तहसीलदार संजय पवार व भंडाराचे पोलीस निरीक्षक सिडाम यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. आंदोलनकांशी चर्चा करून नहराचे पाणी मिळण्यासाठी चर्चा केली.त्यावेळी राजेगाव एमआयडीसी च्या जागेपर्यंत जावून नहराच्या पाण्याची तहसीलदार पवार यांनी पाहणी केली. आंदोलनकर्त्यांना सात दिवसाच्या आत पाण्यासंदर्भात बैठक घेऊन पाणी देण्याची हमी देण्यात आली. अधिकारी वेळेत न आल्याने राजेगाव ग्रामपंचायतसमोर खोदलेल्या खड्ड्यांमध्ये आंदोलकांनी पालकमंत्र्यांचा पुतळा बनवून त्याला पुरले. यावेळी घेण्यात आलेल्या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महासचिव शशीकांत भोयर होते. यावेळी अध्यक्ष डॉ.राजेश नंदूरकर, जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंद गंथाडे, वसंता वासनिक, कुंजन शेंडे, मनोहर सार्वे, दिनेश थोटे, राजू शेंडे, माणिक गंथाडे उपस्थित होते. यावेळी आंदोलनकांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा मानस बोलून दाखविला.यावेळी बसपाचे राजू गणवीर, के.एल. गजभिये, मुकुंद चहांदे, सावरकर, शुभम बोरकर, वसंता वासनिक, प्रमोद वासनिक, संदीप वासनिक, विनायक झंझाड, संदीप थोटे, विजय शहारे, भानूदास सार्वे, देवराम वासनिक, राजू शेंडे, संदीप सार्वे, दिनेश थोटे, मधुकर रामटेके, विजय देशपांडे, दिपक सार्वे, अतुल बंदेले, नारायण वासनिक, आनंदराव गंथाडे, वसंता राऊतकर, चंद्रभान वासनिक, भानुदास सार्वे, नामदेव शेंडे, अतुल रामटेके, अशोक शेंडे, कुंडलीक शेंडे, शेखर थोटे, हरिश्चंद्र बुंदेले, यादोराव वासनिक, रमाबाई वासनिक, प्रभा वासनिक, सकू मेश्राम, शीला हुमणे, संगीता नागदेवे, निर्मला नंदागवळी, निशा मेश्राम यांच्यासह शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.
पाण्यासाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:09 AM
राजेगाव एमआयडीसी येथील ग्रामस्थांना नहराचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी व बहुजन समाज पक्षाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता.
ठळक मुद्देपुतळ्याचे दहन : अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे