गेल्या अनेक वर्षांपासून ईकार्नियाचा विळखा पडतो, परंतु त्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. अडीच वर्षांपूर्वी ईकार्निया निर्मूलनासाठी दोन काेटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा प्रस्ताव लालफितीत अडकला. दरवर्षी ईकार्निया आला की, पर्यावरणप्रेमी आवाज उठवितात. मात्र, पुरानंतर ईकार्निया गोसे प्रकल्पात जाऊन अडकतो. नदीपात्र मोकळे होते. त्यानंतर, ईकार्नियाचा विषय संपूर्ण जातो. आता पुन्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला ईकार्नियाने नदीपात्र व्यापले आहे.
बॉक्स
नागनदीने वाढविले प्रदूषण
नागनदीमुळे वैनगंगेचे पाणी दूषित होते. नागपूर शहरातील कारखान्याचे पाणी नागनदीच्याद्वारे वैनगंगेत येऊन मिसळते. गोसे प्रकल्पामुळे पाणी पुढे वाहून जात नाही. त्यामुळे भंडारा शहराच्या परिसरात वैनगंगेचे पाणी दूषित झाले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. वेगवेगळे उपाय सांगितले जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. परिणामी, वैनगंगेचे पाणी दूषित राहते.