मानक ब्युरोचे दिशानिर्देश धाब्यावर : उत्पादनाची तारीख नाहीराहुल भुतांगे तुमसरपिण्याचा पाण्याचा व्यापार करणारे कंपन्या पाणी पाऊच किंवा पाणी बॉटलवर उत्पादन तिथी न टाकता कालबाह्य झालेला पाणी पाऊच व बॉलची बाजारात विक्री करित आहे. 'बेस्ट बिफोर' नंतर वापरात येणाऱ्या पाण्यात प्लॉस्टिक पाऊच व बॉटलमध्ये आरोग्यास हानीकारक मायक्रेनची संख्या दहापटीने वाढून पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्यातून स्लो पायझेनिंग होत असताना या गंभीर समस्येकडे अन्न प्रशासन विभागाने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.तुमसर तालुक्यात देव्हाडी परिसरात एक खाजगी कंपनी असून तिथे ड्रिंकिंग वाटर नावाने पाणी पाऊच व पाणी बॉटल तयार करून तोपर्यंत तुमसर तालुक्यातील पानठेले, किराणा दुकान, हॉटेल्स, रेस्टारेंट, बार आदी कमी किंमतीत विकूण तो पाणी नागरिकांना खुलेआम विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका कार्यक्रमाप्रसंगी दोनशे ते तीनशे पाणी पाऊच सुअर वॉटर नावाच्या आणल्या असता एका सुज्ञ व्यक्तीने ते पाणी पाऊच हातात घेवून मॅनिफॅक्चरिंग डेट म्हणजे ज्यावेळी पाणी त्या पाऊचमध्ये भरून पॅकींग केली ती तिथी तपासले असता त्या पाऊचवर उत्पादन तिथी तर आढळली नाही परंतू बेस्ट बिफोर ३० दिवस असे लिहून होते. असा प्रकार सर्वच पाऊचमध्ये होत होता. त्यामुळे पाणी नेमके कोणत्या तारखेचे हे जाणून घेण्याकरिता पाऊचवर नमूद असलेल्या कस्टमर केअर नंबरवर फोन केला असता त्यांनी सांगितले की आम्ही कधीही पाऊच वर फोन केला असता त्यांनी सांगितले की आम्ही कधीही पाऊचवर किंवा बॉटलवर उत्पादन तिथी टाकत नसल्याचे धक्कादायक माहिती सांगितली. त्यामुळे पाणी पाऊचची सत्यता बाहेर आली.नागरिकाला शुद्ध पाणी मिळावे म्हणून शासनाने पाण्याला भारतीय ब्युरोअंतर्गत ठेवण्यात आले. त्यानुसार प्रत्येक शीतपेय व पाणी विके्रत्या कंपनीला भारतीय मातक ब्युरोच्या दिशा निर्देयांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पाणी हे पारदर्शक बॉटल व कॅनमधूनच विक्री करणे, कॅन सिलबंद असणे, त्यावर किरकोळ विक्री मुल्य, उत्पादन, तारीख, कंपनीचा नाव पत्ता आदी माहिती असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पाणी स्त्रोताची पातळी, पाण्यातील क्षारांचे प्रमाण व इतर चाचण्याही पाणी प्लँटधारकांना प्रयोगशाळेकडून करून घ्यावे लागतात. नगरपालिका, ग्रामपंचायत, अग्नीशामक व आरोग्य विभागाचेही नाहरकत घेणे बंधनकारक आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रणचे प्रमाणपत्र, ब्रॅण्डनेम नोंदणी, रेनवॉटर, हार्वेस्टींग आर.ओ. यंग आदी व्यवस्था असणे बंधनकारक आहे. पाणी प्लँटमध्ये यातील काही तुरळक व्यवस्था वगळता एकाही गोष्टीची पुर्तता केलेली नाही. कुलिंग कॅन तसेच पाणी पाऊच विके्रत्यांची व खरेदी करणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत असून सर्रासपणे अशुद्ध व विषारी पाणी नागरिकांना पैसाने विकले जात आहे.
पाणी पाऊच नव्हे, 'स्लो पायझेनिंग'!
By admin | Published: December 20, 2015 12:32 AM