चुल्हाड येथे कोट्यवधी रुपये खर्चून आरोग्यवर्धिनी केंद्राची इमारत बांधकाम करण्यात आली आहे. इमारतीत सुविधा नसतांना घाईगर्दीत केंद्र सुरू करण्यात आले. गत शनिवारपासून येथे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मोटरपंप लावण्यात येत असले, तरी यात तांत्रिक बिघाड येत आहे. अनेक वेळा मोटरपंप जळत असल्याने, परिणामी वैधकीय अधिकाऱ्यांनाच विहिरीतून पाणी काढावे लागत आहे.
याच केंद्रात १० ते १५ सौर ऊर्जेवरील पथदिवे लावण्यात आले आहे. इमारत परिसरात ही पथदिवे लावण्यात आले असले, तरी रात्री १० वाजताच बंद होत आहेत. यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहेत. आरोग्य विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुविधा नसल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहेत, परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. कंत्राटदाराचे देयके काढण्यासाठी हस्तांतरण प्रक्रियेत गडबड करण्यात आल्याचे आरोप गावकरी करीत आहेत.
कोट
आरोग्यवर्धिनी केंद्रात पथदिवे व पाण्याची समस्या निर्माण होत आहे. यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
डॉ.संजीव नैतामे वैद्यकीय अधिकारी, चुल्हाड