बंद पडलेले संयंत्र दुरुस्त : जलशुद्धीकरण केंद्र होणार हायटेकलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहराला शुद्ध पाणी पुरवठा करणारी यंत्रणा मागील अनेक महिन्यापासून बंद होती. पाणी शुद्ध करणारे सयंत्रासह फैक्युलेटर टँकमध्ये गाळ भरली होती. ती गाळ काढून अन्य सयंत्र दुरुस्ती केल्याने तुमसरकरांना शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे. नगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापतींनी याकरिता पुढाकार घेतला. तुमसर शहराला वैनगंगा नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. ९ ते१० कि.मी. अंतरावरून मोठ्या जलवाहिनीतून पाणी तुमसर शहरातील शुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया या शुद्धीकरण केंद्रात केली जाते. पाणी शुद्धीकरण केंद्रात मागील काही महिन्यापासून काही सयंत्र बंद होते. फैक्यलेटर टँकमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ होती. येथील ब्रिज बंद पडलेले आहे. सध्या सुरू असलेले दोन बेड वॉश जाम झाले होते. त्यांना दुरुस्त करण्यात आले. नियमानुसार बेड वॉश तीन वर्षातून एकदा स्वच्छ केले पाहिजे. येथील ब्लोअर पंप (हवा घेणारे) बंद पडले आहे. पावसाळ्यात सयंत्र नादुरुस्तीमुळे गढूळ पाणी वितरित करण्यात येत होते. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व पाणीपुरवठा सभापती मेहताबसिंग ठाकुर यांनी पुढाकार घेऊन जलशुद्धीकरण केंद्राला गाळमुक्त करून विविध सयंत्रे दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. मुख्याधिकारी अर्चना मेंढे, पाणी पुरवठा अभियंता कांबळे यांनी शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याकरिता उपाययोजना केली. यात सयंत्र दुरुस्ती व गाळ मुक्त फॅक्युलेटर टँक स्वच्छ कण्याचे ठरले. फॅक्युलेटर टँक गाळमुक्त करून चार बेड वॉशची गाळ काढण्यात आली. देव्हाडी मार्गावरील जलवाहिनीचे लिकेज दुरुस्त करण्यात आले. इतर लिकेज लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहे. कोष्टी पंपगृहामधील दोन स्टँड पोस्ट मोटार पंप येणाऱ्या पुढील दिवसात सुरु करण्यात येणार आहे. उन्हाळ्यात तुमसर शहरात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. नैसर्गिक स्त्रोत (नदी) कोरडी पडत असल्याने त्याचा फटका तुमसर शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर पडतो. अर्धे तुमसर शहरात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नाही. नवीन वसाहतीत पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहचण्याची गरज आहे. वसाहतीत नागरिकांनी विहिरी, कुपनलिका तयार केल्या आहेत.शहरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याकरिता फॅक्युलेटर टँक गाळमुक्त करण्यात आले. येथील अनेक सयंत्रे बंद होते. ती दुरुस्ती करण्यात आली. काही सयंत्रे दुरुस्त करावयाची आहेत. लिकेज दूर करणे सुरु आहे. पाणी गळती थांबविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.-मेहताबसिंग ठाकुर, सभापती, पाणी पुरवठा न.प. तुमसर
जलशुद्धीकरण केंद्र बनले गाळमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:30 AM