शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:34 AM

जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात ओळखला जातो. जवळपास ५ हजाराच्या जवळपास लहान मोठी तलावे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडी पडल्याने यंदा या जिल्ह्याला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देसाठ्यात कमालीची घट : ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात ओळखला जातो. जवळपास ५ हजाराच्या जवळपास लहान मोठी तलावे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडी पडल्याने यंदा या जिल्ह्याला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यातील नदी, नाल्यासह विहीरीही पूर्णत: आटल्या आहेत. पाणी हे जीवन असून, त्याचा वापर योग्य पध्दतीने होण्याची नितांत गरज आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत गाव असो वा शहर सर्वत्रच पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे पाण्याचा होणारा दुरूपयोग टाळून काटकसरीने पाण्याचा वापर करण्याची गरज असल्याचे आवाहन सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात गत काही दिवसापासून नागरिकांना कडक उन्हाचा फटका बसत आहे.उन्हाची तीव्रता वाढतच चालली असून प्रकल्पातील पाणीसाठा खालवत चालला आहे. विहिरी, नदया कोरड्याठण पडत आहेत. यामुळे जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे.पाण्याची भीषण टंचाई असतानाही पाणीपुरवठा विभागाला याचे काही सोयरसुतक वाटत नसल्यामुळे जनतेची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. काही गावांमध्ये मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असला तरी नदी, नाले, बंधारे, धरण हिवाळयामध्येच कोरडी पडली असून काही गावांमधील नागरिकांना दोन ते तीन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणलोट क्षेत्रविकास व मातीबांध, सिमेंट प्लग आदी उपाययोजना केल्यात. परंतु, या सर्व गोष्टींतून पाणी अडविण्याऐवजी शासनाचा निधी जिरविण्याचे काम झाल्यामुळे उपायोजना केवळ कागदापुरत्याच मयार्दीत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पाच्या पाणी पातळीत घट झाली असून, गावातील हातपंप, विहरी कोरड्या पडत आहेत.नळ योजनेला अखेरची घरघरवषार्नूवषार्ची पाणीसमस्या निकाली काढण्यासाठी शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उभ्या करण्यात आलेल्या जिल्हयातील पाणीपुरवठा योजना पुरेशा नियोजनाअभावी ओस पडल्या आहेत. पाणीपुरवढा योजनेमुळे गावातील पाणी समस्येचे निवारण होईल, अशी अपेक्षा टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना होती. मात्र, नागरिकांची समस्या निवारण्याऐवजी त्या आशेवर त्यांच्या नरडा पूर्णता: कोरडा झाला आहे. अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पाणीसमस्या निवारण्यासाठी उभारलेल्या बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजनेला अखेरची घरघर लागलेली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई