शेतकरी संकटात : पावसाची प्रतीक्षासाकोली : तालुक्यातील अनेक तलाव, बंधारे आहेत. मात्र ते कोरडे पडल्याने अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. तालुक्यात बंधाऱ्याची संख्या वाढवायला हवी होती. पण ती वाढली नाही. काही ठिकाणी बंधाऱ्यांना मोठे भगदाड पडल्याने पाणी अडविण्यात ते कुचकामी ठरले आहेत.शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमाअंतर्गत पाण्याची पातळी वाढविणे, शेतीला ओलीताची सोय करणे, जनावरासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी जलसंवर्धन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या साकोली लघुपाटबंधारे विभागाने लाखो रूपये खर्चून बंधाऱ्याची निर्मिती केली परंतु या बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले. यापैकी बऱ्याच बंधाऱ्यात पाणी नाही. संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे हे बंधारे कुचकामी ठरले आहेत. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावात कोट्यावधी रूपये खर्च करून बंधारे बांधले गेली मात्र त्याचा एकही शेतकऱ्याला लाभ घेता आला नाही. बंधाऱ्याच्या लोखंडी पाट्या चोरीला गेल्या आहेत. मात्र त्याची साधी तक्रारही पोलिसात नाही. कोल्हापुरी बंधारे आणि शिवकालीन पाणी साठवण योजना आमच्या काळात ववदान ठरू शकतात. साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव व बोड्यांची संख्या आहे. मात्र शासकीय तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून येते. त्यामुळेही तलावाच्या साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
साकोली तालुक्यात जलसाठे कोरडे
By admin | Published: June 25, 2016 12:23 AM