लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : चिखली येथे आदिवासी यांच्या दफनभूमीचे सपाटीकरण करून अवैध रेतीची साठवणूक केल्याची तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी आदिवासी बांधवांनी निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात बावनथडी नदीपात्रात सामूहिक जलसमाधी घेण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी बांधवांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रभा पेंदाम, जिल्हा परीषद माजी सदस्य अशोक उईके, लक्ष्मीकांत सलामे, सुभाष धुर्वे, कैलास गजाम, मनोहर निनावे, रामललन शुक्ला, अनिल टेकाम, दुर्गा परतेती उपस्थित होते.यावेळी उपस्थित बांधव म्हणाले, बावनथडी नदी पात्रातलगत चिखली येथे गट क्रमांक ४७९/१.१० हे.आर. ही जागा ब्रिटीश काळापासून आदिवासी यांच्या दफनभूमी करिता मुकरर आहे. त्या दफनभूमीच्या जागेचे रेतीघाट चालकाने जेसीबीच्या सहायाने पुरलेले मृतदेह उकरून सपाटीकरण केले. अवैधरित्या रेती वाहतूक करण्यासाठी रस्ता तयार करून दफनभूमीतून ट्रक व ट्रॅक्टरनी वाहतूक करीत आहे. या आशयाची तक्रार २५ जून २०१८ व ९ जुलैला प्रशासनाला देण्यात आली. मात्र अजुनपर्यंत प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. शासन व प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने रेतीघाट चालकाने अजूनपर्यंत अतिक्रमण काढले नाही त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणाविरोधात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.संबंधित जागेवर अतिक्रमण केले असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. त्या जागेवरील रेती जप्त करून लिलाव करण्यात आले आहे. पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.-गजेंद्र बालपांडे,तहसीलदार, तुमसर.
आदिवासींचा जलसमाधीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:37 PM
चिखली येथे आदिवासी यांच्या दफनभूमीचे सपाटीकरण करून अवैध रेतीची साठवणूक केल्याची तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी आदिवासी बांधवांनी निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात बावनथडी नदीपात्रात सामूहिक जलसमाधी घेण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी बांधवांनी पत्रपरिषदेत दिली.
ठळक मुद्देपत्रपरिषद: प्रकरण चिखलीतील दफनभूमीवरील अतिक्रमणाचे