२९ गावांत टंचाई : ७५ लाखांची गरज, विंधन विहिरी, विहीर खोलीकरण व नळदुरुस्तीच्या कामांना प्राधान्यचंदन मोटघरे ल्ल लाखनी पूरक पाणी टंचाई बृहद आराखड्यांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील २९ गावात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. प्रस्तावित कामांना मंजुरी प्राप्त झालेली नसल्याने मार्च महिन्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे.तालुक्यातील पालांदूर (चौ.) येथे २ विंधन विहिरी प्रस्तावित आहेत. त्याकरिता १ लाख ८० हजार रुपये खर्च येणार आहे. निमगाव येथे २ विंधन विहिरी, २ विहिरींचे खोलीकरण करून गाळ काढणे, नळ योजना दुरुस्त करणे, याकरिता ६ लाख २० हजार रुपये प्रस्तावित आहेत. खराशी येथे धानला टोलीवर विहिर खोलीकरण गाळ काढणे व दुरुस्तीकरिता १ लाख रुपये खर्च येणार आहे. घोडेझरी येथे २ विंधन विहिरीसाठी १ लाख ८० हजार रुपये खर्च येणार आहे. पेंढरी येथे नळ योजना सुरु करण्यासाठी ३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सोनमाळा येथे विंधन विहिरी पोहरा येथे २ विंधन विहिरी व नळ योजना दुरुस्तीाठी ५ लाख ८० हजार रुपये प्रस्तावित आहे. लाखोरी येथे विहीर खोलीकरण करून गाळ काढणे व हातपंप प्लरिंग करण्याचे काम घेण्यात येणार आहे. सोमलवाडा (मेंढा) येथे विहीर खोलीकरण व हातपंप फ्लशिंग करण्याचे काम घेण्यात येईल. कवलेवाडा येथे २ विंधन विहिरी प्रस्तावित आहेत. मोगरा (शिवनी) येथे ४ विहिरींचे खोलीकरण करून गाळ काढण्यात येईल. रेंगेपार (कोठा) येथे विंधन विहीर व विहीर खोलीकरण करण्यात येईल. बोरगाव येथे नळ योजना पाईप लाईन दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये प्रस्तावित आहेत. मुरमाडी (सावरी) येथे ६ विंधन विहिरीचे प्रस्ताव आहेत. पिंपळगाव (सडक) येथे ४ विंधन विहिर व विहिर खोलीकरण गाळ काढणे यासाठी ५ लाख ४० हजाराचा निधी अपेक्षित आहे. केसलवाडा (वाघ) येथे ५ विंधन विहिरीसाठी ४ लाख ५० हजार रुपये अपेक्षित आहेत.पाथरी येथे विंधन विहीर, विहीर खोलीकरण गाळ काढणे, नळ योजना दुरुस्तीचे काम घेण्यात येणार आहे. मांगली येथे नळ योजना दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये प्रस्तावित आहेत. रेंगोळा (केसलवाडा) येथे विहीर खोलीकरण करून गाळ काढण्यात येणार आहे. मेंढा येथे नळ योजना दुरुस्ती व उपसा विहिरीचा गाळ काढण्यासाठी २ लाख रुपये खर्च येणार आहे.तालुक्यातील खुनारी २ विहिरी खोल करणे व गाळ काढणे, डोंगरगाव / साक्षर येथे १ विंधन विहिर व विहिरीचे गाळ काढणे, परसोडी येथे २ विंधन विहिरी व विहीर खोलीकरण करून गाळ काढणे, केसलवाडा (पवार) व गराडा येथे विंधन विहिरी प्रस्तावित आहेत. निलागोंदी येथे नळ योजनेकरिता विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. सिंदीपार (मुंडीपार) येथे विंधन विहीर व विहीर खोलीकरण करून गाळ काढण्यात येणार आहे. शिवनी येथे विहीर खोलीकरण मोरगाव (राजेगाव) येथे विंधन विहीर व विहीर खोलीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.शासनातर्फे एप्रिल ते जून २०१६ पर्यंत पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील २९ गावात पाण्याचा अपुरा पुरवठा होतो. त्यामुळे तत्काळ पाणी पुरवठ्याच्या साधनात वाढ होणे आवश्यक आहे. सार्वजनिक साधनापासून दरडोई दर दिवशी पाणी उपलब्धतेचे प्रमाण १९ लिटर आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ७५ लाख रुपयाच्या निधीची गरज आहे.
पाणी टंचाई आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2016 12:45 AM