लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : तुमसर तालुक्यातील लोहारा येथे ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्याने शेतातून पाणी आणुन तहान भागविण्याची वेळ आली आहे. महिला मंडळींना शेतातुन पाणी आणावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने अनेक हातपंप विहिरी कोरड्या पडल्या आहेत.लोहारा येथे नळ योजना आहे पण पाण्याची पातळी खोल गेल्याने सार्वजनिक बोअरवेल सुध्दा झटके देत चालत आहे. त्याच पाणी टंचाई अंतर्गत एक दुसरी बोअर करण्यात आली. तेथे पुर्वीची पाईपलाईन जोडण्याचे काम करण्याकरिता जेसीबीने खोदकाम करीत असताना पुरानी पाईप लाईन फुटल्याने लोहारावासीयांना जो एक वेळ पिण्याचे पाणी मिळत होता तो सुध्दा तिन चार दिवस मिळणार नसल्याने ग्रामपंचायतीने जाहिर केल्याने आता पिण्याचे पाणी कुठून आणावे अशा प्रश्न लोहारा वासीयांना पडला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी लोहारा ग्रामवासीयांनी केली आहे.फुटलेली पाईल लाईन दुरुस्ती करण्याचे काम सुरु असल्याचे समजते. लोहारा येथील जलसंकट दुर करण्याची गरज आहे.
ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:09 PM
तुमसर तालुक्यातील लोहारा येथे ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्याने शेतातून पाणी आणुन तहान भागविण्याची वेळ आली आहे. महिला मंडळींना शेतातुन पाणी आणावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने अनेक हातपंप विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
ठळक मुद्देलोहारा येथील प्रकार : शेतातुन आणतात पाणी, महिला त्रस्त