लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी आणलेले प्लास्टीक पाईपच्या साठ्याला आग लागून संपूर्ण पाईप बेचिराख झाले. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास येथील दसरा मैदानावरील पाण्याच्या टाकीजवळ घडली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.भंडारा शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत ७० कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. त्या अंतर्गत पाणी पुरवठ्याचे साहित्य शहरात ठिकठिकाणी आणून ठेवण्यात आले आहे. यात दसरा मैदानात असलेल्या जलकुंभानजीक लोखंडीतथा प्लास्टीकचे चार इंचीचे पाईप्स ठेवण्यात आले आहे.गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास या पाईपमध्ये अचानक आग लागल्याचे दिसून आले. क्षणार्धात या आगीने रौद्र रुप धारण केले. मोठ्या जलवाहिन्यांना जोडण्यासाठी सदर प्लास्टीक पाईप आणण्यात आले होते. जवळपास १० ते १५ पाईप्सचे बंडल येथे ठेवण्यात आले होते. आग कशी व कोणत्या कारणाने लागली याचा शोध मात्र लागू शकला नाही. नगरपालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी कोट्यवधी रुपयांचे पाईप जळून खाक झाले. घटनास्थळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. यात नगरसेवक आशिष गोंडाणे, संजय कुंभलकर, पाणीपुरवठा कर्मचारी प्रदीप पटेल यांच्यासह अन्य उपस्थित होते.जलकुंभ पडले काळेज्या ठिकाणी प्लास्टीकच्या पाईपला आग लागली त्याच बाजूला जलकुंभात आगीचा धुर जलकुंभाला लागूनच जात असल्याने व आगीच्या लोटाने संपूर्ण जलकुंभ काळेकुट्ट झाले आहे.जलकुंभा शेजारी मद्यपींचा ठिय्यादसरा मैदानात असलेल्या जलकुंभाचा परिसर मोकाट आहे.अशा स्थितीत प्लास्टीकचे पाईप ठेवण्यात आलेल्या जागेतही कुणीही अलगद पोहचू शकतो. विशेष म्हणजे या परिसरात मद्यपींचा सायंकाळनंतर ठिय्या असतो. मद्य प्राशन करणे, सिगरेट, बिड्या, गांजा ओढत असल्याचेही नागरिक सांगतात. जळती सिगरेट किंवा विडी तिथे सांडलेल्या अल्कोहोलच्या संपर्कात येऊन आग लागली की अज्ञात इसमांनी लावली याचा तपास सुरु आहे. वाढीव पाणीपुरवठा संदर्भात कुठलीही कामे थांबणार नाहीत, असे पालिका उपाध्यक्ष आशू गोंडाणे यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्याचे पाईप आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:07 AM
वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी आणलेले प्लास्टीक पाईपच्या साठ्याला आग लागून संपूर्ण पाईप बेचिराख झाले. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास येथील दसरा मैदानावरील पाण्याच्या टाकीजवळ घडली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
ठळक मुद्देदसरा मैदानातील घटना : लाखोंचे नुकसान, आगीचे कारण अज्ञात