शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

जीर्ण जलवाहिनीतून पाणीपुरवठा

By admin | Published: January 03, 2016 1:16 AM

सेंदुरवाफा व साकोली या दोन गावांमध्ये पाणी पुरवठ्याची सुविधा व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सन १९८४-८५ ला जलवाहिनी घालण्यात आली.

संजय साठवणे साकोलीसेंदुरवाफा व साकोली या दोन गावांमध्ये पाणी पुरवठ्याची सुविधा व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सन १९८४-८५ ला जलवाहिनी घालण्यात आली. या जलवाहिनीची कालमर्यादा २२ वर्षे ठरविण्यात आली. आता ३० वर्षांचा कालावधी लोटूनही त्याच जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरु आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसरी पाणीपुरवठा योजना तयार आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे ही योजना एक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. लोकप्रतिनिधींची उदासिनता साकोलीवासीयांना भोवत आहे. शुध्द पाणीपुरवठा करणारी योजना तयार असुनही नागरिकांना पाण्यापासुन वंचित राहावे लागत आहे. साकोली ग्रामपंचायतचे रुपांतर आता नगरपंचायतमध्ये झाले असून लवकरच साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गाव मिळून नगरपरिषद घोषित होणार आहे. ३० वर्षांपूर्वी साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाईपलाईन टाकून चुलबंद नदीवर पंपहाऊस तयार करण्यात आले. यातून पाणी एम. बी. पटेल महाविद्यालयाच्या मागील पहाडीवर बांधण्यात आलेल्या टाकीत सोडले जात होते. तिथुन हे पाणी साकोली व सेंदूरवाफा या दोन्ही गावाला सोडले जात होते. आठ वर्षापूर्वी महामार्ग चौपदरीकरणाचे कामात सेंदुरवाफा येथे जाणारी पाईपलाईन अस्ताव्यस्त झाली. तेव्हापासुन येथे पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गणेश वॉर्ड व तलाव वॉर्ड येथील पाणीपुरवठा सुरु असून उर्वरित ठिकाणचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे साकोली येथे पाणीटंचाई आहे. या योजनेच्या जलवाहिनी कलावधीची मुदत संपली तरी अधिकारी कसे काय शांत बसले असा प्रश्न आहे. कालांतराने शासनाने पुन्हा जीवन प्राधिकरण विभागामार्फत साकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजना तयार केली. ही पाणीपुरवठा योजना मागील पाच वर्षापासून तयार असून जीवन प्राधिकरणतर्फे ही योजना वर्षभर सुरळीत चालविण्यात आली. यानंतर ही योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घेऊन पाणीपुरवठा करणे होते. मात्र योजना हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे प्राधिकरणने एक वर्षापुर्वी ही योजना गुंडाळली असून परिणामी पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.