सिराज शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : येथील नळयोजनेला ४७ वर्ष पूर्ण झालेले असून संपूर्ण नळयोजना कालबाह्य झालेलीे आहे. त्यामुळेच मोहाडीत पाणीसमस्येने विक्राळ रुप धारण केलेले आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.येथील पंचायत समिती कार्यालयाजवळील पहिली व जुनी पाण्याची ४० फूट उंच जलकुंभ जीर्ण झाले ते केव्हाही कोलमडू शकते. परिणामी मोठा अपघात सुद्धा घडू शकतो. ही टाकी दोन तीन ठिकाणाहून लिकेज आहे. मोहाडी येथे सन १९७२ रोजी नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. त्यावेळी मोहाडीची भौगोलिक स्थिती व लोकसंख्येच्या आधारावर पाण्याची टाकी व पाईपलाईन टाकण्यात आली होती. या नळयोजनेची कालमर्यादा २५ वर्षे ठरविण्यात आली होती. नगरपंचायत प्रशासनाने दोन वर्षापूर्वी वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र तो प्रस्ताव अजुनही धूळ खात आहे.२५ वर्षानंतर ही नळयोजना कालबाह्य घोषित करुन नवीन पाणीपुरवठा योजना तयार करणे आवश्यक होते. परंतु याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. आठ वर्षापूर्वी मोहाडी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव पारित करुन नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करुन तसे प्रस्ताव प्रशासनाला पाठविले होते.मात्र त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात न आल्याने प्रशासनाने त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. मोहाडीतील जलवाहिनी ४२ वर्षापूर्वी टाकण्यात आली होती. त्याकाळी गावातील रस्ते व घरे खोलगगट भागात होते. कालांतराने रस्ते व घरे उंच होत गेले. त्यामुळे ती जलवाहिनी ७ ते ८ फूट खोल गेली आहे. त्याामुळे आजच्या स्थितीत पाणी नळाद्वारे वरपर्यंत पोहतच नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.यासाठी लोकांनी ७ ते ८ फूट खोल टाके बनवून नळाचे पाणी घेत आहेत. यापासून नागरिक त्रस्त झाले आहेतत. पावसाळ्यात या खोल टाक्यात पावसाचे गढुळ पाणी जमा होते व तेच पाणी पाईपलाईनमध्ये शिरुन तेच गढूळ व अशुद्ध पाणी नळाद्वारे येवून लोकांना प्यावे लागते. त्यामुळे साथीचे रोग बळावतात. ही पाईपलाईन ४७ वर्षे जुनी असल्याने तिही जर्जर झाली आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.ही पाईपलाईन ७ ते ८ फुट जमिनीधाली असल्याने ती फुटल्यास त्याचा पत्ता लागत नाही. व कितीतरी गॅलन पाणी जमिनीतच जिरतो व लोकांना फक्त २ ते ३ गुंड पाणीच प्राप्त होते.येथील पंचायत समिती जवळील पाण्याच्या टाकीची अवस्था जर्जर झालेली असून या टाकीतील सिमेंट व लोखंडाचे बार लिकेजमुळे सडलेले असून जंग लागलेला आहे. तसेच अनेक ठिकाणचा प्लास्टर उखडलेला आहे. या पाण्याच्या टाकीत हजारो गॅलेन पाणी असतो. आणि एवढा भार सहन करण्याची क्षमता या टाकीची राहिलेली नाही. त्यामुळे केव्हाही मोठा अनर्थ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.प्रस्तावाकडे दुर्लक्षग्रामसभेत आठ वर्षापूर्वी नवीन नळयोजनेच्या प्रस्तावासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. तसा प्रस्तावही पाणीपुरवठा विभागाला पाठविण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षापूर्वीही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्तावाचे काय झाले याचा पाठपुरावा ग्रामपंचायतीने करणे जरुरीचे होते. मात्र त्या प्रस्तावाचा पाठपुरावाच करण्यात न आल्याने प्रशासनाचेही त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच आहे. आतातरी पाठपुरावा करणार की नाही हे स्थानिक प्रशासनावर अवलंबून आहे.
मोहाडीत कालबाह्य नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:31 AM
येथील नळयोजनेला ४७ वर्ष पूर्ण झालेले असून संपूर्ण नळयोजना कालबाह्य झालेलीे आहे. त्यामुळेच मोहाडीत पाणीसमस्येने विक्राळ रुप धारण केलेले आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
ठळक मुद्देनवीन प्रस्ताव दोन वर्षांपासून धूळखात : योजना ४७ वर्षे जुनी, मर्यादा होती २५ वर्षांची